तळेरेत दुर्मीळ पुस्तकांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेरेत दुर्मीळ पुस्तकांच्या
प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
तळेरेत दुर्मीळ पुस्तकांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

तळेरेत दुर्मीळ पुस्तकांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

57913
तळेरे ः वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित पुस्तक प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी. (छायाचित्र : एन. पावसकर)


तळेरेत दुर्मिळ पुस्तकांच्या
प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

तळेरे, ता. २१ ः येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय आणि वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा झाला. यानिमित्त वाचनालयातील विविध भाषेतील दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले होते.
अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत ऊर्फ दादा वरुणकर उपस्थित होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे माजी अध्यक्ष अशोक मुद्राळे, उपाध्यक्ष राजू वळंजू, कार्यकारी सदस्य हेमंत महाडिक, शाळा समिती सदस्य प्रवीण वरुणकर, डॉ. मनीषा नारकर, दळवी महाविद्यालयाचे प्राध्यापक हेमंत महाडिक, तळेरे विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, श्रावणी कॉम्प्युटरच्या श्रावणी मदभावे, प्रमोद कोयंडे, शशांक तळेकर, सतीश मदभावे, विद्यालयाच्या ग्रंथालय विभागाचे प्रमुख सहायक शिक्षिका डी. सी. तळेकर, ज्येष्ठ शिक्षक सी. व्ही. काटे, एन. बी. तडवी, पी. एम. पाटील, पी. एन. काणेकर, प्राध्यापिका ए. बी. कानकेकर, ए. पी. कोकरे, एन. पी. गावठे, व्ही. डी. टाकळे, ए. बी. तांबे, एस. यु. सुर्वे, एस. एन. जाधव, शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश घाडी, देवेंद्र तळेकर, संदेश तळेकर, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य अविनाश मांजरेकर, अॅड. मनिषा नारकर, प्रमोद कोयंडे, संजय पाताडे, श्रावणी मदभावे, प्रमुख पाहुणे दादा वरूणकर यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित केले. प्रा. हेमंत महाडीक यांनी प्रास्तविक केले. सहायक शिक्षिका डी. सी. तळेकर यांनी सूत्रसंचालन केले. एस. यू. सुर्वे यांनी आभार मानले.