आर्थिक उन्नतीसाठी पुढे या ः गावडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्थिक उन्नतीसाठी 
पुढे या ः गावडे
आर्थिक उन्नतीसाठी पुढे या ः गावडे

आर्थिक उन्नतीसाठी पुढे या ः गावडे

sakal_logo
By

आर्थिक उन्नतीसाठी
पुढे या ः गावडे

बांदेश्वर दुग्ध संस्थेचे सहकार्य

बांदा, ता. २१ ः दुधाची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनातून आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी संस्था नेहमीच प्रोत्साहन देत असते. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक मार्फत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि इतर संलग्न आर्थिक महामंडळे, तसेच शासनाच्या नवनवीन योजनांचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी. त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन संस्था करेल. केवळ त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन श्री बांदेश्वर दुग्ध संस्थेचे अध्यक्ष नारायण गावडे यांनी येथे केले.
‘गोकुळ’कडून प्राप्त बोनसमध्ये भरघोस वाढ करून गाईच्या दूधला ८ टक्के आणि म्हशीच्या दुधाला १०.५० टक्के बोनस देण्यात येणार आहे. गणेशोत्सवाला आणि दिवाळीला भेटवस्तू तसेच वाढीव बोनस असे वर्षभर शेतकऱ्यांच्या हिताचे कार्यक्रम संस्था करत असतेच. शेतकऱ्यांना शासनस्तरावर जादा आर्थिक फायदे आणि शंका निरसनासाठी एक समिती करण्यात येईल, असे संस्थेचे खजिनदार रत्नाकर आगलावे यांनी स्पष्ट केले. सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी, सहकार कायद्याच्या अधीन राहून संस्थेचा फायदा आणि शेतकऱ्यांचा नफा या दोन्ही विचारात घेवून भविष्यात कार्यरत राहू असे सर्व संचालक मंडळाने यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम उर्फ बाळा आकेरकर, सचिव मनोज सावंत, संचालक अनिरुद्ध उर्फ नंदू पिळणकर, आनंद वसकर आदी उपस्थित होते.