धान्य वितरित ऑफलाईन करण्याची बांद्यात मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धान्य वितरित ऑफलाईन
करण्याची बांद्यात मागणी
धान्य वितरित ऑफलाईन करण्याची बांद्यात मागणी

धान्य वितरित ऑफलाईन करण्याची बांद्यात मागणी

sakal_logo
By

57930
swt2111.jpg मध्ये फोटो आहे.

धान्य वितरित ऑफलाईन
करण्याची बांद्यात मागणी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २१ ः येथील शासनमान्य रास्त धान्य दुकानात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नेटवर्कअभावी अंगठा न लागल्यास ऑफलाईन धान्य वितरित करावे, लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर लिहून घ्यावे व सोईनुसार ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावी. दिवाळी सणासाठी अट शिथिल करावी, यासाठी लोकांची अडवणूक करू नये, अशी मागणी बांदा भाजपच्या वतीने करण्यात आली.
आज सकाळी बांदा रास्त दुकानात नेटवर्कच्या अडचणीमुळे धान्य वितरित होत नसल्याच्या तक्रारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी तथा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, संदीप बांदेकर, सुभाष मोर्ये, डुमा बांदेकर यांनी याठिकाणी येत ऑफलाईन धान्य वितरित करण्याची मागणी केली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लोकांची अडवणूक करू नका. त्यांना तात्काळ धान्य देऊन मागाहून ऑनलाईन प्रक्रिया करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सावंतवाडी पुरवठा अधिकारी यांच्याशी देखील फोन वरून चर्चा करण्यात आली.