राजिवड्यात श्वानांना त्वचारोगची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजिवड्यात श्वानांना त्वचारोगची लागण
राजिवड्यात श्वानांना त्वचारोगची लागण

राजिवड्यात श्वानांना त्वचारोगची लागण

sakal_logo
By

राजिवड्यात श्वानांना त्वचारोगची लागण
रत्नागिरी ः शहरातील राजिवडा येथे श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक श्वानांना झालेल्या त्वचारोगामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जमातूल मुस्लिमिन राजीवडा कोअर कमिटीने या श्वानांवर वेळीच उपचार करण्याची मागणी पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे. श्वानांमधील त्वचारोगामुळे त्यांच्यातून दुर्गंधी येत आहे. काही श्वानांच्या डोक्यावर, अंगावर जखमा झाल्या आहेत, तर काही श्वान पिसाळलेल्या अवस्थेत असून लोकांवर हल्ले करून चावा घेतलेला आहे. श्वानांवरील आजार स्थानिक रहिवाशांना होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यासाठी राजिवडा कोअर कमिटीने पुढाकार घेऊन या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. श्वानांवर वेळीच उपचार करण्यासाठी झाडगाव येथील तालुका पशुसंवर्धन लघू चिकित्सालय येथे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी राजिवडा कोअर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
-----
भंडारी समाजातील यशस्वीतांना आवाहन
रत्नागिरी ः कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळ, दादर मुंबईतर्फे समाजातील दहावीत ७५ टक्के, बारावीत ७० टक्के, पदवीधर ६० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या तसेच कला-क्रीडाक्षेत्रात विजयश्री प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव रत्नागिरीतील कित्ते भंडारी सभागृह येथे होणार आहे. यासाठी विद्यार्थी अथवा त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स आणि मोबाईल नंबर लवकरात लवकर कित्ते भंडारी हॉल येथे आणून द्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भरत वासुदेव शेट्ये यांनी केले आहे.
------
देसाई अॅकॅडमीतर्फे हिवाळी प्रशिक्षण
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यातून उत्तम दर्जेदार क्रिकेटपटू तयार व्हावेत या उद्देशाने मारूती मंदिर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पटांगणावर (कै.) छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीतर्फे शालेय मुले, मुलांसाठी २२ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत हिवाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सर्व वयोगटातील मुलांसाठी राहाणार आहे. प्रशिक्षण शिबिर सकाळी व संध्याकाळी अशा दोन सत्रात होईल. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत प्रशिक्षक बाबा चव्हाण, सुनील लिंगायत, रत्नागिरीतील नामवंत क्रिकेटपटू सुभाष पटवर्धन, अक्षय कोळंबेकर, विश्वनाथ लिंगायत हे प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी उद्या सकाळी ७ वा. स्टेडियमवर गणवेशासह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी अॅकॅडमीचे सचिव दीपक देसाई यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष गजेंद्र पाथरे यांनी केले आहे.
-------
वासुदेव सानेंसाठी आज शोकसभा
साडवली ः देवरूख शहरातील सेवानिवृत्त शिक्षक व शिष्यवृत्ती परीक्षेचे उत्तम मार्गदर्शक वासुदेव मोरेश्वर साने यांचे रविवारी (ता. १६) निधन झाले. वासुदेव साने यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले. वासुदेव साने यांच्याविषयी विद्यार्थी व पालक यांच्या अनेक भावना आहेत. त्या व्यक्त करण्यासाठी शनिवारी (ता. २२) तारखेला सायं. ४ वा. श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालय येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहरवासियांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन गजानन जोशी, संजय भागवत, अमेय लिमये यांनी केले आहे.
-----------
ratchl२११.jpg
57849
चिपळूण ः मंदार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

मंदार स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन
चिपळूण ः तालुक्यातील पेढांबे येथील मंदार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कोळकेवाडी केंद्रप्रमुख लांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी व मुख्याध्यापिका मधुमती शिंदे यांनी वाचनाचे व स्वच्छतेचे महत्व सांगितले. लांडे यांनी जाखडी नृत्य करणारा अद्विक कुंभार याचे कौतुक केले. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अतिशय उत्साहात कार्यक्रम झाला.
-------------
ratchl२१२.jpg
L57850
गुहागरः प्रभाकर आरेकर यांचा सत्कार करताना भंडारी समाजाचे पदाधिकारी.
-----------
प्रभाकर आरेकर यांचा गौरव
चिपळूणः कोकणातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांना ''सकाळ'' समूहाचा बेस्ट चेअरमन आणि भंडारी एकीकरण समितीच्यावतीने भंडारी भूषण हा पुरस्कार मिळाला. याबद्दल गुहागर तालुका भंडारी समाजाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कित्ते भंडारी ऐक्यवर्धक संस्थेचे व गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे, नीलेश मोरे, तुषार सुर्वे, दीपक शिरधनकर, मुरलीधर बागकर आदी उपस्थित होते.