रत्नागिरी- सविता कामत विद्यामंदिरमध्ये कोजागिरी, दिवाळी कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- सविता कामत विद्यामंदिरमध्ये कोजागिरी, दिवाळी कार्यक्रम
रत्नागिरी- सविता कामत विद्यामंदिरमध्ये कोजागिरी, दिवाळी कार्यक्रम

रत्नागिरी- सविता कामत विद्यामंदिरमध्ये कोजागिरी, दिवाळी कार्यक्रम

sakal_logo
By

rat21p15.jpg-
57917
रत्नागिरी ः सविता कामत विद्यामंदिरमध्ये कोजागिरी दीपावलीचा आनंदोत्सव साजरा करताना विद्यार्थी पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात कलाविष्कार सादर करताना कलाकार श्रीकांत ढालकर.
----------
सविता कामत विद्यामंदिरमध्ये
कोजागिरी, दिवाळी कार्यक्रम
रत्नागिरी, ता. २१ः मतिमंदांसाठी कार्यरत आविष्कार संस्थेच्या सविता कामत विद्यामंदिरमध्ये कोजागिरी निवास प्रकल्प व दिवाळी कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. शाळेतील मुलांनी एक रात्र आपल्या कुटुंबीयांपासून बाजूला होऊन शाळेत राहण्याचा हा अनोखा कार्यक्रम चांदणे कलाविष्काराच्या या नावाने सजला होता.
बुधवारी (ता. १९) संध्याकाळी विद्यार्थी शाळेत आले. सर्वांनी प्रार्थना म्हटली. हरहुन्नरी कलाकार श्रीकांत ढालकर यांनी मिमिक्रीचा कार्यक्रम सादर केला. यामध्ये गणपतीच्या गाण्यावर गणपतीचे चित्र रेखाटन, विविध पक्ष्यांचे आवाज, बोलक्या बाहुल्याचा खेळ तसेच मातीपासून सोप्या वस्तू तयार करणे या गोष्टी मुलांना दाखवल्या. विविध कलाविष्काराचा असणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना आनंदित आणि उल्हासित करून गेला. त्यानंतर सर्वांसाठी मिसळपाव हा मुलांचा आवडता खाऊ होता. पालकांनी आणि विद्यार्थी, शिक्षकांनी यात काही गीते, नृत्य सादर केली.
टीआरपी येथील कामत विद्यामंदिरचा परिसर किल्ला, आकाशकंदील, रोषणाईने झगमगत होता. रात्री विद्यार्थ्यांना चांदण्यातली सफर घडवली. मसाला दूध पिऊन विद्यार्थी शाळेतच झोपले. सकाळी मुलांना उटणं, तेल, शोभिवंत फटाके, फराळ असा दीपावली सणाचा अनुभव देण्यात आला. मुलांनी नवीन कपडे घालून किल्ल्यासमोर फटाके वाजवले. त्यानंतर दिवाळीतील वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन व भाऊबीज हे कार्यक्रम साजरे करण्यात आले. कार्यक्रमात मुख्याध्यापिका वैशाली जोशी यांनी माहिती दिली. दिवाळीची गाणी सादर करण्यात आली. त्यानंतर सर्वांना दिवाळीचा फराळ देण्यात आला. अशा प्रकारे दिव्यांग विद्यार्थ्यांनी कोजागिरी व दीपावलीचा आनंद लुटला.