देवगडात धान्य पुरवठा सुरळित करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडात धान्य पुरवठा
सुरळित करण्याची मागणी
देवगडात धान्य पुरवठा सुरळित करण्याची मागणी

देवगडात धान्य पुरवठा सुरळित करण्याची मागणी

sakal_logo
By

57937
swt2113.jpg मध्ये फोटो आहे.


देवगडात धान्य पुरवठा
सुरळीत करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २१ : तालुक्यातील रास्त दराच्या धान्य दुकानावरील धान्य पुरवठा सुरळीत करण्याची येथील तालुका शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची मागणी आहे. आपल्या मागणीचे निवेदन येथील तहसीलदारांना देण्यात आले. नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनी निवेदन स्वीकारले.
रास्त धान्य दुकानावर धान्याचा पुरवठा होत नसल्याच्या कारणास्तव येथील तालुका शिवसेनेच्यावतीने नायब तहसीलदारांची भेट घेण्यात आली. यावेळी उपतालुकाप्रमुख तथा नगरसेवक निवृत्ती ऊर्फ बुवा तारी, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, नगरसेवक तेजस मामघाडी, गणेश गावकर, प्रफुल्ल कणेरकर तसेच अन्य उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील सर्व रेशन धान्य दुकानांवरील धान्य पुरवठा सध्या अनियमित स्वरुपात होत आहे. दोन दिवसांवरती दिवाळी सण येऊन ठेपला आहे. शासनामार्फत दिवाळी सणासाठी विशेष धान्य पुरवठा जाहीर झाला आहे. परंतु तो रेशन दुकानांमार्फत अनियमितपणे वितरीत होत आहे. रेशन दुकान चालकांना याचे कारण विचारले असता ऑनलाइन प्रणाली (सर्व्हर) हा अनियमितपणे सुरू असल्याने धान्य पुरवठा वितरीत करण्यात समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे जनतेला धान्य मिळत नाही. दिवाळी सणाचा विचार करता पुरवठा ऑफलाइन पद्धतीने वितरीत करण्याचे त्वरित आदेश सर्व रेशन दुकान चालकांना द्यावे, अशी मागणी आहे.