उमेद फाउंडेशनतर्फे बांद्यात फराळसह कपड्यांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमेद फाउंडेशनतर्फे बांद्यात
फराळसह कपड्यांचे वाटप
उमेद फाउंडेशनतर्फे बांद्यात फराळसह कपड्यांचे वाटप

उमेद फाउंडेशनतर्फे बांद्यात फराळसह कपड्यांचे वाटप

sakal_logo
By

57983
बांदा ः येथे उमेद फाउंडेशनच्या वतीने दिवाळी फराळाचे वाटप करताना मान्यवर.

उमेद फाउंडेशनतर्फे बांद्यात
फराळसह कपड्यांचे वाटप

बांदा, ता. २१ ः सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच समाजातील गरीब घटकांसाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देणाच्या भावनेतून उमेद फाउंडेशनने वंचित, गरजू आणि दीनदुबळ्यांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने केलेले फराळ व कपडे वाटप हा कौतुकास्पद उपक्रम असल्याचे उद्‌गार माजी सभापती शीतल राऊळ यांनी येथे काढले.
दिवाळीच्या लखलखाटात गोरगरिबांची दिवाळी मात्र अंधारात चाचपडत साजरी होते. मात्र, त्यांनाही काही क्षण गोड-धोड खाऊन, लखलखाट जाणवावा यासाठी उमेद फाउंडेशनने पुढाकार घेत येथील केंद्रशाळेत फराळ व कपडे वाटपाचा उपक्रम घेतला. या कार्यक्रमात यावेळी ५० हून अधिक कुटुंबांना फराळ, आकाशकंदील, पणत्या व कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या परिसरातील गरजू १० विद्यार्थ्यांना उमेदच्या माध्यमातून शिष्यवृत्तीचे धनादेश वितरित केले. यावेळी व्यासपीठावर सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश मोरजकर, उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर, गुणेश गवस, प्रवीण परब, उत्कर्षा परब, श्रीमती गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेदीयन तथा शिक्षिका स्वाती पाटील यांनी केले. त्यांनी सांगितले की, सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी उमेदच्या माध्यमातून गेली २ वर्षे हा उपक्रम सुरू आहे. त्यामुळे अनेकांची दिवाळी आनंदमय बनली आहे. शिक्षक जे. डी. पाटील यांनी आभार मानले.