देवदर्शन, यात्रेसाठी एसटीचे नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवदर्शन, यात्रेसाठी एसटीचे नियोजन
देवदर्शन, यात्रेसाठी एसटीचे नियोजन

देवदर्शन, यात्रेसाठी एसटीचे नियोजन

sakal_logo
By

देवदर्शन, यात्रेसाठी एसटीचे नियोजन
साडवली ः प्रवाशांच्या सेवेसाठी देवरूख एसटी आगाराने विशेष नियोजन केले आहे. सणासुदीच्या दिवसातून देवदर्शन, यात्रा, मौज सहल याकरिता महाराष्ट्र राज्यात किंवा महाराष्ट्र राज्याबाहेरसुद्धा राज्य परिवहन देवरूख आगाराकडून वाडीवस्तीवरील गट, समुहाच्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी त्यांच्या सोयीनुसार जाण्यासाठी दोन रात्री, तीन दिवस, तीन रात्री, चार दिवस अशा कालावधीसाठी सहलींचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी प्रवासी गटांना त्यांच्या वाडीवस्तीवरून गावच्या ठिकाणापासून देवदर्शन, यात्रा, सहलीसाठी विशेष पर्यटन हेतूने एसटीची बस माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवाशांनी किंवा समूहप्रमुख, ग्रामविकास मंडळ, सामाजिक मंडळे, धार्मिक मंडळ यांच्या सोयींनी त्यांच्या मागणीनुसार बस उपलब्ध करून घेण्यासाठी आगार प्रशासनाकडे संपर्क साधावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांनी केले आहे.