सारस्वत मंडळातर्फे आयोजित प्रदर्शनाची आज सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सारस्वत मंडळातर्फे आयोजित प्रदर्शनाची आज सांगता
सारस्वत मंडळातर्फे आयोजित प्रदर्शनाची आज सांगता

सारस्वत मंडळातर्फे आयोजित प्रदर्शनाची आज सांगता

sakal_logo
By

rat21p20.jpg
57940
रत्नागिरीः सारस्वत मंडळातर्फे आयोजित प्रदर्शनात पाहणी करताना डॉ. शरद बोर्डवेकर, डॉ. किशोर सुखटणकर आणि सहकारी.
---------------
सारस्वत मंडळातर्फे आयोजित
प्रदर्शनाची आज सांगता
रत्नागिरी, ता. २१ः येथील सारस्वत स्नेहवर्धक मंडळातर्फे सारस्वती पद्धतीने तयार केलेल्या पदार्थांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध डॉ. शरद बोर्डवेकर यांनी केले. या प्रदर्शनाचा शनिवारी (ता. २२) शेवटचा दिवस आहे.
सारस्वती पद्धतीने तयार केलेले चवदार मसाले, विविध पदार्थांची पिठे, लोणची, दिवाळी फराळाचे विविध नावीन्यपूर्ण पदार्थ, पापड, कुरडई, तयार कपडे, आकाश कंदील, काजूगर, उटणे, पणत्या, खाद्यपदार्थ आदी वस्तूंचे प्रदर्शन अभ्युदयनगर येथील यशोधन अपार्टमेंट येथे सुरू आहे. डॉ. बोर्डवेकर यांनी सर्व स्टॉलना भेटी देऊन स्टॉलधारक उद्योजकांचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष डॉ. किशोर सुखटणकर, निमंत्रक अॅड. संध्या सुखटणकर, उपाध्यक्ष संजय बांदिवडेकर, सचिव वसंत वाकडे, सदस्य नारायण आजगावकर, प्रदीप तेंडुलकर, विस्मया कुळकर्णी, उत्पल वाकडे, निनाद तेंडुलकर, स्टॉलधारक व्यावसायिक आणि नागरिक उपस्थित होते. या उपक्रमाकरिता संस्थेला दुकान गाळा उपलब्ध करून देणारे सुनील भोंगले यांचे संस्थेच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.