रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

पान ५ साठी, संक्षिप्त)

५७९५७
-rat२१p२५.jpg-

जोशी ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शन
रत्नागिरी ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (कै.) बाबूराव जोशी ग्रंथालयात प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. या वेळी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, ग्रंथालय समिती समन्वयक आणि संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, ग्रंथपाल किरण धांडोरे उपस्थित होते. प्रास्ताविक सहाय्यक ग्रंथपाल उत्पल वाकडे यांनी केले. या वेळी प्राचार्य डॉ. कुलकर्णी म्हणाले, दिवाळी अंक हा दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करणारा एक महत्त्‍वाचा घटक आहे. फराळासोबत दिवाळी अंक हाती असणे ही एक साहित्यिक पर्वणीच असते. कथा, कविता, वैचारिक लेख, ऐतिहासिक माहिती, गडकिल्ले, आरोग्य, अर्थ, सामान्य ज्ञान साहित्य प्रकार समोर ठेवून या अंकांची केलेली निर्मिती हा एक महत्त्‍वाचा वार्षिक दस्तऐवज आहे. या वर्षीचे दिवाळी अंक या दृष्टीने विविधांगी असून महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना निश्चितच वाचनीय ठरतील, असा आशावाद त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला. वाचक गटाचा विद्यार्थी ओंकार आठवले याने आभार मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्राध्यापक, वाचक गटाचे विद्यार्थी, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.


५७८९७
-rat२१p१२.jpg-

बॅंक ऑफ इंडियातर्फे हिंदी मास साजरा
रत्नागिरी ः बँक ऑफ इंडियाच्या रत्‍नागिरी विभागीय कार्यालयाद्वारे हिंदी महिना मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. या महिन्‍यामध्‍ये विविध स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाच्यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना बँक ऑफ इंडियाचे विभागप्रमुख संतोष सावंतदेसाई यांनी सांगितले, १४ सप्‍टेंबर १९४९ ला संविधान सभाने सरकारी कार्यालयांच्‍या कामकाजामध्‍ये एकसूत्रता आणण्याकरिता हिंदीला राजभाषेचा दर्जा दिला. हा दिवस हिंदी दिवस म्‍हणून भारतभर साजरा केला जातो. बँक ऑफ इंडिया रत्‍नागिरी विभागीय कार्यालयाने १४ सप्‍टेंबर ते १४ ऑक्‍टोबर असा एक महिना हिंदी महिना म्‍हणून साजरा केला. या दरम्‍यान सर्व शाखांमध्‍ये हिंदीचा प्रचार प्रसारासाठी कार्यक्रम आयोजित केले. हिंदीमधून जास्‍तीत जास्‍त बँकेचे अंतर्गत कामकाज केले जाते. यावर्षीही विभागीय कार्यालय तथा सर्व शाखांतील कर्मचारीकरिता विविध हिंदी स्‍पर्धांचे आयोजन केले. विजेत्‍या कर्मचाऱ्यांना विभागप्रमुख संतोष सावंतदेसाई व विभाग उपप्रमुख राजेंद्र काळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन हिंदी वरिष्‍ठ अधिकारी रमेश गायकवाड यांनी केले.