वैभव खेडेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैभव खेडेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर
वैभव खेडेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

वैभव खेडेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

sakal_logo
By

वैभव खेडेकर यांना
अटकपूर्व जामीन मंजूर
खेड, ता. २१ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यापाठोपाठ आता मनसेच्या कार्यकर्त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गणेशोत्सवातील लॉटरी घोटाळा प्रकरणात मनसेच्या तीन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना खेड पोलिसांनी गुरुवारी (ता. २०) अटक केली आहे. रस्ते आस्थापना जिल्हा संघटक मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, विद्यार्थीसेनेचे तालुकाप्रमुख प्रसाद शेट्ये आणि केदार वणंजू या तिघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, वैभव खेडेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केला असल्याने त्यांची अटक तूर्तास टळली आहे
गणेशोत्सवातील लॉटरी घोटाळा प्रकरणात वैभव खेडेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती; मात्र आता उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने खेडकर यांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरुद्ध सप्टेंबरमध्ये खेड पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. मनसेच्यावतीने गणेशोत्सव कालावधीमध्ये विनापरवानगी लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करून लोकांकडून पैसा गोळा केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद झाली होती. अरबाज असगरअली बडे यांच्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी वैभव खेडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.