जिल्ह्यात उद्योगासाठी २०० कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात उद्योगासाठी २०० कोटी
जिल्ह्यात उद्योगासाठी २०० कोटी

जिल्ह्यात उद्योगासाठी २०० कोटी

sakal_logo
By

57990
सिंधुदुर्गनगरी ः आमदार प्रवीण दरेकर यांचा सत्कार करताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी. शेजारी आमदार प्रसाद लाड, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत आदी.


जिल्ह्यात उद्योगासाठी २०० कोटी

प्रवीण दरेकर ः मुंबई बँक, जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज

ओरोस, ता. २१ ः मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योग निर्माण होण्यासाठी २०० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. यातून सवलतीच्या दरात कर्ज वितरण करण्यात येणार आहे. पर्यटन आणि स्थानिक उत्पादनाशी अनुसरून व्यवसाय उभारणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. यातून रोजगार निर्मिती व्हावी. तसेच तरुणांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी दोन्ही जिल्हा बँकेंचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुंबई जिल्हा बँक अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्गनगरी येथील प्रधान कार्यालयाला आमदार दरेकर यांनी आज सदिच्छा भेट दिली. या वेळी मुंबई बँक संचालक आमदार प्रसाद लाड, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, संचालक बाबा परब, संदीप सावंत, प्रभाकर सावंत, धोंडू चिंदरकर आदी उपस्थित होते.
या वेळी दरेकरांनी जिल्हा बँक अध्यक्ष दळवी, उपाध्यक्ष काळसेकर यांच्याकडून जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी अध्यक्ष दळवी यांनी दरेकर व लाड यांचे स्वागत केले. दरेकर म्हणाले, ‘‘मुंबई बँकेच्या माध्यमातून आम्ही विदर्भ, मराठवाडा भागात कर्ज वितरण करतो; परंतु, कोकणातील तरुणांकडून एक लाख रुपयांचीही कर्ज मागणी आतापर्यंत आमच्याकडे आलेली नाही. येथील व्यक्ती अजूनही कर्ज घेण्यास घाबरतात. ही वृत्ती बदलली पाहिजे. त्यामुळे भविष्यात ही वृत्ती बदलण्यासाठी कर्ज वितरणाचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हा बँक १०० कोटी आणि मुंबई बँकने १०० कोटी रुपये आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील व्यावसायिकांनी घ्यावा.’’ यावेळी दरेकर यांनी छोटे छोटे प्रकल्प बँकेच्या माध्यमातून डिझाईन करून तो अमलात आणूया, असे आवाहन केले.