पान एक-जिल्हा पोलीस अधिक्षकपदी दाभाडेंना तात्पुरती पुर्ननियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-जिल्हा पोलीस अधिक्षकपदी
दाभाडेंना तात्पुरती पुर्ननियुक्ती
पान एक-जिल्हा पोलीस अधिक्षकपदी दाभाडेंना तात्पुरती पुर्ननियुक्ती

पान एक-जिल्हा पोलीस अधिक्षकपदी दाभाडेंना तात्पुरती पुर्ननियुक्ती

sakal_logo
By

पान एक

58038
राजेंद्र दाभाडे


जिल्हा पोलिस अधीक्षकपदी
दाभाडेंना तात्पुरती पुनर्नियुक्ती
बनसोडेंची नियुक्ती रद्द; पुढील आदेशापर्यंत निर्णय
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २१ ः सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षकपदी पवन बनसोड यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून केलेली नियुक्ती रद्द करतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची झालेली बदली रद्द करीत त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षकपदी तात्पुरती पुनर्नियुक्ती दिली आहे. शासनाने आज याबाबत पुन्हा आदेश काढले आहेत.
शासनाने काल (ता. २०) राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची बदली करीत त्यांच्या जागी औरंगाबाद ग्रामीण भागाचे अपर पोलिस अधीक्षक पवन बनसोड यांना पदोन्नतीने नियुक्ती दिली होती. दाभाडे यांना पदस्थापना दिली नव्हती. त्यामुळे जिल्ह्याला पवन बनसोड यांच्या रूपाने नवीन पोलिस अधीक्षक मिळणार होते. मात्र, आज शासनाने पुन्हा यात बदल करीत दाभाडे यांची बदली तात्पुरती पुढील आदेश येईपर्यंत स्थगित केली आहे. त्यांना सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक म्हणून काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. औरंगाबादचे अपर पोलिस अधीक्षक पवन बनसोड यांना कार्यमुक्त करू नये, असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे राजेंद्र दाभाडे यांचा पोलिस अधीक्षक म्हणून मुक्काम पुढील आदेश येईपर्यंत वाढला आहे.