चिपळुणात मुसळधार पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात मुसळधार पाऊस
चिपळुणात मुसळधार पाऊस

चिपळुणात मुसळधार पाऊस

sakal_logo
By

ratchl२१३.jpg
५७९९६
चिपळूणः शहरात झालेला मुसळधार पाऊस.
---------------
चिपळुणात मुसळधार पाऊस
दिवाळीच्या उत्साहावर पाणी; ग्राहक, विक्रेत्यांची धावपळ
चिपळूण, ता. २१ः कोरोना कालावधीतील दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात आहे. परिणामी येथील बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. त्यातच दिवाळीच्या वसुबारसच्या दिवशीच मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे दिवाळीच्या उत्साहावरच अक्षरशः पाणी फेरल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. पावसात आपला माल भिजू नये यासाठी विक्रेत्यांची तारांबळ उडाली.
दोन वर्षे कोरोना परिस्थिती होती. त्यामुळे येथील व्यापारीवर्ग हैराण झाले होते. त्याशिवाय २२ जुलै २०२२ ला महापुरात मोठा फटका बसला. त्यातून व्यापारी अजूनही सावरलेले नाहीत. अनेकांनी कर्ज काढून दुकानांची दुरुस्तीची काम केली तर अनेकांनी उधारीने मालाची उचल केली आहे. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवातही पावसामुळे व्यवसाय झाला नाही. त्यामुळे आता दिवाळीत व्यवसाय होईल, अशी सर्वांना अपेक्षा असताना त्यावरही पावसाने पाणी फेरले आहे. यावर्षी शहरासह ग्रामीण भागात दिवाळीविषयी नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राहकांना विविध वस्तू, साहित्य, जीवनावश्यक वस्तू, दिवाळीचे अन्य साहित्य खरेदी करता यावे यासाठी बाजारपेठही सजली आहे; मात्र हल्ली परतीच्या पावसाने दुपारपासूनच हजेरी लावण्यास सुरवात केल्याने त्याचा परिणाम खरेदीवर झाला आहे. पावसामुळे जेवढा माल विक्रीसाठी लावला जातो तेवढाच उचलावा लागत असल्याने छोटे-छोटे विक्रेते मेटाकुटीस आले आहेत. त्यातच ग्राहकांची संख्याही रोडावली आहे.