पान एक-दुचाकी-मोटार धडकेत पुरळमध्ये तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-दुचाकी-मोटार धडकेत
पुरळमध्ये तरुणाचा मृत्यू
पान एक-दुचाकी-मोटार धडकेत पुरळमध्ये तरुणाचा मृत्यू

पान एक-दुचाकी-मोटार धडकेत पुरळमध्ये तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

पान एक

दुचाकी-मोटार धडकेत
पुरळमध्ये तरुणाचा मृत्यू
मृत राजापूरचा ः खरेदीहून परतताना दुर्घटना
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २१ : तालुक्यातील पडेल जामसंडे मार्गावरील पुरळ कोंडामा तिठा येथे दुचाकी व मोटार यांच्यामध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दिनेश भिकाजी गावकर (वय ३६, रा. अणसुरे -आडीवाडी ता. राजापूर) असे त्याचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी (ता. २०) सायंकाळच्या सुमारास घडला. याबाबत संतोष भिकाजी गावकर (वय ३२) यांनी विजयदुर्ग पोलिसांकडे आपली फिर्याद दिली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक भारतकुमार फार्णे यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अणसुरे (ता. राजापूर) येथील दिनेश गावकर गुरुवारी (ता. २०) मोटारसायकल घेऊन देवगड येथे खरेदी करण्यासाठी आला होता. सायंकाळच्या सुमारास तो घरी परतत असताना जामसंडे ते पडेल मार्गावरील पुरळतिठा भागात दुचाकी आणि मोटार यांच्यामध्ये धडक होऊन अपघात झाला. अपघातात मोटारसायकलस्वार दिनेश गावकर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच विजयदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. अपघाताची नोंद विजयदुर्ग पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. संतोष गावकर यांच्या फिर्यादीनुसार अपघातग्रस्त मोटारचालकाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार श्री. गलोले करीत आहेत.