दाभोळ ः 5 कोटी 81 लाखाचा अपहार प्रकरणी सावंत शरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः 5 कोटी 81 लाखाचा अपहार प्रकरणी सावंत शरण
दाभोळ ः 5 कोटी 81 लाखाचा अपहार प्रकरणी सावंत शरण

दाभोळ ः 5 कोटी 81 लाखाचा अपहार प्रकरणी सावंत शरण

sakal_logo
By

पान १ साठी

तत्कालीन लेखापाल सावंत शरण
दापोली नगरपंचायत; पाच कोटी ८१ लाख शासकीय निधीचा अपहार
दाभोळ, ता. २१ ः दापोली नगरपंचायतीत शासकीय निधीचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल असलेले तत्कालीन लेखापाल दीपक सावंत पोलिसांसमोर शरण आले असून त्यांना अटक केली. उद्या (ता. २२) त्यांना दापोली येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
२०२१-२२ या आर्थिक वर्षात नगरपंचायतीच्या विविध बँकखात्यांमधून ५ कोटी ८१ लाख १० हजार ३०९ इतक्या रकमेचा अपहार केला असून त्यापैकी १ कोटी ३० लाख ४९ हजार २०८ रक्कम पुन्हा खात्यात जमा केल्याचे चौकशी समितीला आढळले होते. या कालावधीत दीपक सावंत यांच्याकडे लेखापाल पदाची जबाबदारी होती. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये नगरपंचायतीच्या विविध बँक खात्यामधून ५ कोटी ८१ लाख १० हजार ३०९ इतक्या रकमेचा अपहार केला असून त्यापैकी १ कोटी ३० लाख ४९ हजार २०८ इतकी रक्कम पुन्हा खात्यात जमा केली आहे. या प्रकरणी संशयित दीपक सावंत यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याची तक्रार लेखापाल सिद्धेश खामकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीनुसार संशयित दीपक सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
लेखापाल सिद्धेश खामकर विकास योजनांच्या बँकखात्यांची स्टेटमेंट तपासत असताना त्यांना काही रकमा श्री एंटरप्रयाझेस, मंगेश पवार, शंकर पवार या नावाने विविध खात्यात शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त १ कोटी ३० लाख २०८ इतकी रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आले. १४ सप्टेंबरला खामकर यांनी ही बाब मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर खामकर यांनी श्री एंटरप्रयाझेस, मंगेश पवार, शंकर पवार यांच्या खात्यांची तपासणी केली असता त्यांनी नगरपंचायतीचे कोणतेही काम न करता त्यांना या रकमा आदा केल्याचे समोर आले. या रकमा १ एप्रिल २१ ते ३१ मार्च २२ या कालावधीत आदा केल्या होत्या. त्या कालावधीत दीपक सावंत हे लेखापाल होते. त्यामुळे दीपक सावंत यांना या संदर्भात खुलासा करावा, असे पत्र दिले. मात्र सावंत यांनी कोणताही खुलासा केला नाही. त्यामुळे त्यांना १६ सप्टेंबरला निलंबित करून चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली. या समितीने १ एप्रिल २१ ते ३१ मार्च २२ या कालावधीतील आर्थिक लेखे तपासून अहवाल सादर केला.
आज दुपारी संशयित दीपक सावंत याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्याच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तपास करण्यासाठी पोलिसांकडून सावंत यांना पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात येईल, अशी माहिती तपास अधिकारी तथा खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशीद यांनी दिली.