Kokan : ‘आनंदाचा शिधा’चे सावंतवाडीत वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan
‘आनंदाचा शिधा’चे सावंतवाडीत वाटप

Kokan : ‘आनंदाचा शिधा’चे सावंतवाडीत वाटप

सावंतवाडी : गरिबांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने राज्याकडून ‘आनंदाचा शिधा’ योजनेंतर्गत शंभर रुपयांमध्ये तेल, तूरडाळ, साखर, रवा आदी किराणा माल धान्य दुकानातून देण्यात आला. या योजनेचा प्रारंभ आज सावंतवाडी शहरात संजय मळीक यांच्या धान्य दुकानातून भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सणानिमित्त गरिबांना दिवाळीची भेट देताना शंभर रुपयांमध्ये रास्त धान्य दुकानावर एक किलो साखर, एक किलो तूरडाळ, एक किलो रवा व तेल असा किराणा माल देऊ केला आहे. गरिबांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्व रास्त धान्य दुकानांवर योजनेचा लाभ मिळत आहे. सावंतवाडी शहरात संजय मळीक यांच्या रास्त धान्य दुकानात या योजनेचा लाभ भाजपचे जिल्हा प्रवक्ते परब यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उपस्थित ग्राहकांनी राज्य सरकार, तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले.