तळेरे-गगनबावडा रस्त्याबाबत व्यापाऱ्यांची अभियंत्यांशी चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेरे-गगनबावडा रस्त्याबाबत
व्यापाऱ्यांची अभियंत्यांशी चर्चा
तळेरे-गगनबावडा रस्त्याबाबत व्यापाऱ्यांची अभियंत्यांशी चर्चा

तळेरे-गगनबावडा रस्त्याबाबत व्यापाऱ्यांची अभियंत्यांशी चर्चा

sakal_logo
By

58084
खारेपाटण ः राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण कार्यालयात अभियंता शिवनिवार यांना निवेदन देताना जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी.

तळेरे-गगनबावडा रस्त्याबाबत
व्यापाऱ्यांची अभियंत्यांशी चर्चा
कुडाळ ः राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण कार्यालय, खारेपाटण येथे जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन तळेरे-गगनबावडा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत चर्चा करत २६ पर्यंत रस्ता दुरुस्ती करण्याबाबत सूचना केली. यावेळी अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होऊन अभियंता शिवनिवार यांना निवेदन देण्यात आले. शिवनिवार यांनी तातडीने ठेकेदाराला रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले व प्रत्यक्ष कामाला सुरवातही झाली. सभेनंतर काही पदाधिकाऱ्यांसमवेत शिवनिवार यांनी प्रत्यक्ष तळेरे-वैभववाडी प्रवास करून दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कार्यवाह नितीन वाळके, उपाध्यक्ष संजय भोगटे, द्वारकानाथ घुर्ये, कणकवली अध्यक्ष दीपक बेलवलकर, अशोक करंबेळकर, वीरेन चिके, राजू जठार, मधुकर नलावडे, आंबेरकर, संजय लोके, राजन नाईक, आदित्य महाडिक, नंदन वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
............
58087
दौंड ः रोहन केरकर यांना गौरविताना चिरंजीव प्रसाद.

केरकरांना ‘बॉक्सिंग’मध्ये सुवर्ण
साटेली भेडशी : केर गावचे सुपुत्र सैनिक रोहन केरकर यांनी बॉक्सिंग क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले. त्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. नुकतीच दौंड येथे ऑल एस.आर.पी.एफ. मधून बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा पार पडली. यामध्ये केरकर यांनी सुवर्ण पदक पटकावले. त्यांना एस.आर.पी.एफ.चे चीफ ॲडिशनल डीजी चिरंजीव प्रसाद (आयपीएस) यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करून गौरविण्यात आले.