प्रा. शलाका वालावलकरांना मुंबई विद्यापीठाची पीएच. डी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. शलाका वालावलकरांना 
मुंबई विद्यापीठाची पीएच. डी
प्रा. शलाका वालावलकरांना मुंबई विद्यापीठाची पीएच. डी

प्रा. शलाका वालावलकरांना मुंबई विद्यापीठाची पीएच. डी

sakal_logo
By

58089
सावंतवाडी : शलाका वालावलकर यांचे अभिनंदन करताना राजेसाहेब खेमसावंत भोसले, शुभदादेवी भोसले, लखमसावंत भोसले, श्रद्धाराजे भोसले.

प्रा. शलाका वालावलकरांना
मुंबई विद्यापीठाची पीएच. डी
सावंतवाडी ः येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय प्राणिशास्त्र विभागाच्या प्रा. शलाका वालावलकर यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त केली. त्यांनी ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कांदळवनातील जैवविविधता’ विषयावर प्रबंध सादर केला होता. यासाठी त्यांना प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोसले, कार्याध्यक्षा शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमसावंत भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, संस्था पदाधिकारी प्रा. डी. टी. देसाई, अॅड. शामराव सावंत, जयप्रकाश सावंत, प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रतीक्षा सावंत यांनी अभिनंदन केले. या प्रसंगी प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. संजय महापुरे, डॉ. गणेश मर्गज, प्रा. रविना गवस, आयक्यूएसी को-ऑर्डिनेटर डॉ. बी. एन. हिरामणी आदी उपस्थित होते.
...............
58088
सदाशिव मेस्त्री

सदाशिव मेस्त्रींना पुरस्कार जाहीर
कुडाळ ः आर्ट बिट्स फाउंडेशन पुणेतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ‘कला सन्मान’ पुरस्कारासाठी चेंदवण-टेंबवाडी येथील रहिवासी व बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतार नाट्यमंडळ, कवठी (ता. कुडाळ) या मंडळातील युवा झांज वादक सदाशिव मेस्त्री यांची निवड झाली. कला क्षेत्रातील कलाकारांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. मेस्त्री यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड केली आहे. या निवडीचे पत्र त्यांना संस्थेमार्फत देण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. पुरस्काराबद्दल मेस्त्री यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. संस्था गेली एकवीस वर्षे चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला अशा सर्व कला क्षेत्रातील कलाकारांना व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. त्यामुळे आपली कला लाखो लोकांपर्यंत पोहोचली जाते. सर्व स्तरांतील कलाकारांनी संस्थेकडे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थापक-संचालक संतोष पांचाळ यांनी केले आहे.