जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव साजरा
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव साजरा

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव साजरा

sakal_logo
By

rat२२p२३.jpg-
५८११८
नाणीजः येथे संतपीठावरून भाविकांना आशीर्वाद देताना जगद्गरू नरेंद्राचार्य महाराज.
-------------
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव साजरा
नाणीजमध्ये लोकसंस्कृतीचा जागर; विविध कार्यक्रम उत्साहात
रत्नागिरी, ता. २१ः महाराष्ट्राचा ठेवा असलेल्या लोकसंस्कृतीचा सुंदरगडावर जागर व देशभरातील प्रमुख आखाड्याच्या संतमहंताकडून एकत्रितपणे केलेले औक्षण अशा उत्साही वातावरणात जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव साजरा झाला. वाद्यांचा गजर, जयघोषानउत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला होता.
नाणीज परिसरात सतत कोसळत असलेल्या पावसाची पर्वा न करता भाविक जथ्याने उत्सवाचे साक्षिदार होण्यासाठी सुंदरगडावर दाखल झाले. शुक्रवारी सकाळी जगद्गुरू श्रींचे आगमन झाले. सर्व देवदेवतांचे दर्शन घेऊन ते संतपीठावर आले. त्यावेळी भाविकांनी एकच जल्लोश केला. गर्दीतले सारे हात उंचावले गेले. जगद्गुरू श्रींनीही हात उंचावून सर्वांना आशीर्वाद दिले. त्याचवेळी देशाच्या विविध राज्यातील आखाड्यांचे व मठांचे प्रमुख संतमहंत या सोहळ्यात सहभागी झाले होते. काहींनी जगद्गुरू श्रींच्यांवर पोवाडे सादर केले. पूजा, आरती नंतर सर्वांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे जन्मसोहळ्यानिमित्त औक्षण केले. त्यानंतर संतपीठावर लोकसंस्कृतीचा सोहळा रंगला. त्यात कोळीनृत्य, आदिवासी व धनगरी नृत्य, गोवन फोक, गर्बा, बाल्या नृत्य, गोंधळ, पोवाडा अशा सर्व लोककलांचा सहभाग होता. दरम्यान सकाळी १० पासून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज चरण दर्शन सोहळा झाला. भाविकांची प्रचंड रांग त्यासाठी होती. त्यानंतर उत्तर रायगड जिल्ह्याचे भजन झाले. दुपारी महा मृत्यूंजय सप्तचिरंजीव यागाची सांगता झाली. सर्व धार्मिक विधी नाशिकचे भालचंद्र शास्त्री गुरूजी यांनी केले.
तरडगाव (ता. कर्जत, जि. अहमदनगर) व नाशिकहून निघालेल्या दिंड्या सकाळी श्रीक्षेत्री दाखल झाल्या. त्यांचे स्वागत संस्थानच्या तरडगावची पायी दिंडी ५ ऑक्टोबरला निघाली होती. दिंडीचे हे २६ वर्ष आहे. ४५० किलो मीटरचा प्रवास आहे. त्यात ३०० भाविक सहभागी होते. या दिंडीचे प्रमुख गणी अहमद सय्यद हे मुस्लिम समाजातील स्वामीजींचे निस्सिम शिष्य आहेत. तसेच दुसरी दिंडी नाशिकहून ३० सप्टेबरला निघाली होती. तिचा प्रवास ६०० किलो मीटरचा आहे. त्यात ३०० भाविक सहभागी झाले आहेत. त्यांचे हे १८ वे वर्ष आहे. सोहळ्यादिवशी त्यांचे सुंदरगडावर आगमन झाले.