एसटीची 10 टक्के भाडेवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीची 10 टक्के भाडेवाढ
एसटीची 10 टक्के भाडेवाढ

एसटीची 10 टक्के भाडेवाढ

sakal_logo
By

दहा नोव्हेंबरपर्यंत एसटीची १० टक्के भाडेवाढ
फेऱ्याही वाढल्या ; महामंडळाला आर्थिक हातभार
रत्नागिरी, ता. २२ ः एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढीची अंमलबजावणी सुरू केली आहे. दिवाळीनिमित्त सर्व मार्गावरील फेऱ्यांमध्ये १० टक्क्यांनी भाडेवाढ झाली आहे. परिवहन महामंडळाच्या आदेशानुसार रत्नागिरीत परिवहन महामंडळानेही २१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरदरम्यान ही भाडेवाढ लागू केली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांची मुख्य वाहिनी म्हणून महामंडळाच्या लालपरीकडे (एसटी) पाहिले जाते. अनेक संकटावर मात करत ही सार्वजनिक वाहतूक सुरू आहे. कोरोना महामारीतील दीड ते दोन वर्षात तर एसटीची सेवा ठप्पच होती. त्यातून सावरत वाहतूक सुरू झाली; मात्र त्यानंतर लगेच कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी एक दोन नव्हे तर सलग ५ महिने संप केला. एसटीच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा संप होता. त्यामुळे पाच महिन्याच्या कालावधीत नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्याय शोधला आणि एकूण प्रवाशांपैकी २० टक्के प्रवासी या काळात तुटला तो अजून जोडला गेला नाही. दिवसेंदिवस एसटी तोट्याच्या आर्थिक खाईत लोटत आहे. यातून सावरण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू आहेत. एसटीची मालवाहतूक हा त्याला चांगला पर्याय मिळाला आहे; परंतु यातून आर्थिक स्थिती सावरण्यासारखी नाही. त्यामुळे महामंडळाला आर्थिक हातभार लागावा यासाठी दिवाळीच्या सणामध्ये हंगामी भाडेवाडीचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये लालपरीच्या प्रवासी वाहतुकीला चांगली गर्दी होते. याच संधीचा फायदा उठवत परिवहन महामंडळाकडून १० टक्के भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ काल २१ ऑक्टोबरला लागू झाली आहे ती १० नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. रत्नागिरी विभागीय वाहतूक अधिकारी ए. पी. जाधव यांनी सांगितले.
-------------
चौकट
एक नजर
* दिवाळीनिमित्त एसटी फेऱ्यांमध्ये वाढ
* ३ हजार ७७५ एसटी कर्मचारी
* कर्मचाऱ्यांना ५ हजारची दिवाळी भेट