दिवाळी अंक प्रदर्शनाचे सावंतवाडीत उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी अंक प्रदर्शनाचे
सावंतवाडीत उद्‍घाटन
दिवाळी अंक प्रदर्शनाचे सावंतवाडीत उद्‍घाटन

दिवाळी अंक प्रदर्शनाचे सावंतवाडीत उद्‍घाटन

sakal_logo
By

58135
सावंतवाडी : दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्‍घाटन करताना संजू परब यांच्यासह मान्यवर.

दिवाळी अंक प्रदर्शनाचे
सावंतवाडीत उद्‍घाटन
सावंतवाडी, ता. २२ ः येथील श्रीराम वाचन मंदिरतर्फे सभासद वाचकांना दीपावलीनिमित्त दिवाळी अंक वाचक योजना सुरू करण्यात आली आहे. दिवाळी अंकांचे प्रदर्शन ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित केले आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली ‘कावळ्यांची अंडी आणि गडगडलेलं सरकार’ ही कथा वाचण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी नगराध्यक्ष परब यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळी अंक आणि साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी श्रीराम वाचन मंदिराच्या माध्यमातून होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. श्रीराम वाचन मंदिराच्या माध्यमातून १८५२ पासून वाचन संस्कृती टिकवून ठेवली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष अॅड. संतोष सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. वाचन मंदिरचे कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी आभार मानले. अधिकाधिक वाचकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बाळा बोर्डेकर, राजेश मोंडकर, महेंद्र पटेल, रंजना कानसे, गुरुप्रसाद वाडकर आदी उपस्थित होते.