नेटवर्क समस्येमुळे धान्यपुरवठा ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेटवर्क समस्येमुळे धान्यपुरवठा ठप्प
नेटवर्क समस्येमुळे धान्यपुरवठा ठप्प

नेटवर्क समस्येमुळे धान्यपुरवठा ठप्प

sakal_logo
By

58142
कास ः नेटवर्क समस्येमुळे धान्यपुरवठा ठप्प झाल्याने ग्राहकांचा झालेला खोळंबा.


नेटवर्क समस्येमुळे धान्यपुरवठा ठप्प

कासमध्ये ग्राहकांचा खोळंबा;...अखेर ऑफलाईन पुरवठा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २२ ः नेटवर्क समस्येमुळे कास सोसायटीमधील धान्यपुरवठा शनिवारी ठप्प झाला. ऐन दिवाळीच्या तोंडावर नेटवर्क समस्या दुपारपर्यंत कायम राहिल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पंडित यांनी सावंतवाडी तहसीलदारांशी संपर्क साधला; मात्र तहसीलदारांनी ऑफलाईन पुरवठा करण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे अखेर स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत ऑफलाईन धान्यपुरवठा करण्यास सुरुवात केली.
ग्रामीण भागात सध्या नेटवर्क समस्या रोजचीच झाली आहे. त्याचा फटका शनिवारी कास सोसायटीच्या धान्य दुकानाला बसला. शनिवारी सकाळपासूनच नेटवर्क समस्या असल्याने ग्राहकांचा खोळंबा झाला. चार तास ताटकळत राहिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. नेटवर्क समस्या कायमची असल्याची तक्रार स्थानिकांनी केली. याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पंडित यांनी नेटवर्क समस्येची माहिती तहसीलदारांना दिली; मात्र ऑफलाईन धान्यपुरवठा करण्यास त्यांनी असमर्थता दाखविली. त्यामुळे स्थानिकांनीच पुढाकार घेत ऑफलाईन धान्य देण्यास सुरुवात केली. यावेळी प्रवीण पंडित, देवीदास सातार्डेकर, सुवर्णा पंडित, ज्ञानेश्वर किनळेकर, सुलोचना पंडित, मारुती किनळेकर, कीर्ती पंडित, कृष्णा पंडित, सुप्रिया पंडित, प्रेरणा राणे, सीताबाई पंडित, सीताबाई भगत, आनंदी कासकर, सुविता कासकर, विष्णू कासकर, लक्ष्मी कासकर, शुभांगी राणे, पार्वती पंडित, श्रीराम सातार्डेकर, लवू हरमलकर, मनोहर किनळेकर, गणेश न्हावी, भागिरथी हरमलकर आदींनी पुढाकार घेतला.