रिक्षा व्यावसायिकाची मालवणात आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षा व्यावसायिकाची
मालवणात आत्महत्या
रिक्षा व्यावसायिकाची मालवणात आत्महत्या

रिक्षा व्यावसायिकाची मालवणात आत्महत्या

sakal_logo
By

58144
नीलेश आंबेरकर

रिक्षा व्यावसायिकाची
मालवणात आत्महत्या
मालवण, ता. २२ : वायरी येथील रिक्षा व्यावसायिक नीलेश मुरलीधर आंबेरकर (वय ४६) याने राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री उघडकीस आली. नीलेशने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासाअंती व्यक्त केला. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक नितीन नरळे, युवराज झांजुर्णे, पोलिस कर्मचारी संतोष टेंबुलकर, कैलास ढोले यांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. नीलेश यांच्यामागे पत्नी, मुलगा, भाऊ व अन्य परिवार आहे.