खरेदीसाठी व्यापाऱ्यांची ग्राहकांना भावनिक साद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरेदीसाठी व्यापाऱ्यांची ग्राहकांना भावनिक साद
खरेदीसाठी व्यापाऱ्यांची ग्राहकांना भावनिक साद

खरेदीसाठी व्यापाऱ्यांची ग्राहकांना भावनिक साद

sakal_logo
By

खरेदीसाठी व्यापाऱ्यांची
ग्राहकांना भावनिक साद
ऑनलाइन खरेदीने बेजार ;स्थानिकाना पसंती द्या
चिपळूण, ता. २२ः महापुरात स्थानिक व्यापारी पूर्ण भरडला गेला आहे. त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन खरेदीपेक्षा स्थानिक बाजारपेठेतील दुकानांमधून खरेदीचा आनंद घ्यावा. स्थानिक दुकानदार सदैव नागरिकांच्या मदतीला धावून आला आहे. याचा विचार करता स्थानिक दुकानातूनच खरेदी करावी, अशी भावनिक साद दिवाळीच्या निमित्ताने व्यावसायिकांकडून ग्राहकांना घालण्यात आली आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि डिजिटल युगात अनेक गोष्टींमध्ये बदल झाला आहे. खरेदीची पद्धतदेखील बदलली आहे. बहुतांशी नागरिक स्थानिक दुकानांना विसरत ऑनलाइन खरेदी करत आहे. प्रत्येक वस्तू घरपोच मिळत असल्याने गेल्या काही दिवसात ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेड अधिकच वाढला आहे. याचा परिणाम स्थानिक दुकानदारांवर होत आहे. गेल्या वर्षी महापूर आला त्या संकटात सर्वाधिक नुकसान व्यापाऱ्यांचे झाले. अजूनही व्यापारी संकटातून बाहेर पडलेले नाही. कोरोनासारख्या संकटात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता स्थानिक दुकानदारांनी दैनंदिन गरजेची प्रत्येक वस्तू नागरिकांपर्यंत पोचवली आहे. त्या वेळी ऑनलाइन खरेदी सेवादेखील कोलमडली होती. तरीदेखील आपणही कुटुंबाचा एक भाग आहोत या जाणिवेतून दुकानदार रात्री अपरात्री, अडचणीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी धावले आहे. नागरिक स्थानिक दुकानदारांकडून करत असलेल्या खरेदी-विक्रीवरच दुकानदाराचे कुटुंबदेखील अवलंबून आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक दुकानदारांबाबत आपली जबाबदारी ओऴखत दिवाळीच्या निमित्ताने बाहेर पडावे, असे आवाहन सोशल मीडियावर केले जात आहे.
-----------
कोट
कोरोना, महापुराच्या संकटातून व्यापारी बाहेर पडत आहेत. त्याला ग्राहकांचे सहकार्य अपेक्षित आहे. बाजारपेठेस पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नागरिकांनी स्थानिक दुकानातून खरेदी करावी, अशा प्रकारचे आवाहन आम्ही ग्राहकांना करत आहोत. नागरिकांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
- आशिष खातू, व्यापारी खेर्डी
---------------
कोट
स्थानिक बाजारपेठेतून नागरिकांनी खरेदी करावी हे शंभर टक्के मान्य आहे; मात्र व्यापाऱ्यांनीही आपल्या सेवेत बदल केला पाहिजे. ऑनलाइन वस्तू स्वस्त मिळतात; मात्र स्थानिक बाजारपेठेत त्याच वस्तू महाग मिळतात. वस्तूंच्या किमती कमी केल्या तर निश्चित ग्राहक त्याचा विचार करतील.
- अनुष्का चितळे, ग्राहक चिपळूण