मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाड येथे दीपोत्सव साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाड येथे दीपोत्सव साजरा
मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाड येथे दीपोत्सव साजरा

मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाड येथे दीपोत्सव साजरा

sakal_logo
By

मॉडर्न इंग्लिश स्कूल
बुरंबाड येथे दीपोत्सव
संगमेश्वर, ता. २२ः प्रथम सत्र संपले की वेध लागतात ते दिवाळी सुट्टीचे. मग आकाशकंदील, पणत्या, रांगोळी यांची लगबग सुरू होते. या सणाचे औचित्य साधून यशवंत शिक्षणसंस्थेच्या मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाड या प्रशालेत दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रकारचे आकाशकंदील बनवले. सर्व विद्यार्थ्यांनी बाजारातील साध्या पणत्यांवर आपल्या हाताने रंग देऊन सुंदर नक्षीकाम करण्यात आपली कलाकुसर दाखवली. विद्यार्थिनी रांगोळी काढण्यात दंग झाल्या होत्या तर विद्यार्थ्यांनी दगड मातीचा किल्ला तयार केला. त्यावर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी रंगवलेल्या पणत्यांची आरास केली. सध्याच्या काळात रेडिमेड वस्तूंचा वापर केला जातो. त्यामुळे या जुन्या कलाकुसरीचे ज्ञान मुलांना मिळावे तसेच सणाचे महत्व समजावे तसेच त्यातून निसर्गाची हानी न करता प्रदूषणमुक्त आनंद कसा लुटावा याची माहिती देणे हा एकमेव उद्देश ठेवून प्रशालेने हा उपक्रम राबवला. हा उपक्रम शाळेच्या पर्यवेक्षिका सिमी खोत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.