बांद्यातील नाबर स्कूलमध्ये दिवाळी साहित्याचा स्टॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यातील नाबर स्कूलमध्ये
दिवाळी साहित्याचा स्टॉल
बांद्यातील नाबर स्कूलमध्ये दिवाळी साहित्याचा स्टॉल

बांद्यातील नाबर स्कूलमध्ये दिवाळी साहित्याचा स्टॉल

sakal_logo
By

58158
बांदा ः नाबर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी बनविलेले दिवाळी साहित्य खरेदी करताना मान्यवर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)


बांद्यातील नाबर स्कूलमध्ये
दिवाळी साहित्याचा स्टॉल

विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २२ ः येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एम.एस.एफ.सी. (तंत्र शिक्षण) विभागाच्या माध्यमातून मुलांनी स्वनिर्मितीतून बनविलेले सुगंधी उटणे, पणत्या, मेणबत्ती या दिवाळी साहित्याच्या स्टॉलला कामत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश कामत यांनी भेट देत कौतुक केले.
राज्यात तंत्रशिक्षण अभ्यासक्रम शिकविणारी नाबर हे एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत तंत्र शिक्षणात भरारी घेतली आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थी स्वनिर्मितीचा आनंद घेतात. शाळेत यावर्षी दिवाळीनिमित्त लागणाऱ्या रंगीबेरंगी पणत्या, सुगंधी उटणे, मेणबत्ती या साहित्याची शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी निर्मिती केली आहे. या स्टॉलला ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश कामत, उद्योजक भाऊ वळंजू, शशिकांत पित्रे, स्कूल कमिटी सदस्य प्रकाश वालावलकर, पत्रकार नीलेश मोरजकर, मंगल कामत, मयूर चराटकर, विश्वनाथ नाईक, शैलेश गवस यांनी भेट दिली. यावेळी साहित्याची खरेदी करत मुलांच्या कलेला प्रोत्साहनदेखील दिले. मुख्याध्यापिका मनाली देसाई, एम.एस.एफ.सी. विभागप्रमुख रिना मोरजकर, समन्वयक राकेश परब, गायत्री देसाई, रिया देसाई आदी उपस्थित होते.