विज पडल्याने कासमध्ये गाईचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विज पडल्याने कासमध्ये गाईचा मृत्यू
विज पडल्याने कासमध्ये गाईचा मृत्यू

विज पडल्याने कासमध्ये गाईचा मृत्यू

sakal_logo
By

जामसंडेत आज ‘स्वरदीपोत्सव’
देवगड ः दीपावली सणाच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता. २३) सायंकाळी सहाला जामसंडे येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात वाडा येथील ‘स्वरऋतू’ निर्मित ‘स्वरदीपोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. देवगड ‘मँगो सिटी’मधील कार्यक्रमाचा पहिलाच प्रयत्न आहे. प्रमोद जोशी व प्रसाद शेवडे प्रमुख पाहुणे, तर गायक कलाकार अभिजित भट (रत्नागिरी), करुणा पटवर्धन (रत्नागिरी), राधा जोशी (देवगड), राधिका बोडस (देवगड) यांचा समावेश आहे. वादक कलाकारांमध्ये हार्मोनियम- चैतन्य पटवर्धन (रत्नागिरी), सिंथेसायझर- हर्षद जोशी (देवगड), सुरेश काजारी (मुंबई), तबला- सौरभ वेलणकर (वाडा), पखवाज- आकाश तावडे, ऑक्टोपॅड- अरविंद जोगळे (चिपळूण) यांचा सहभाग आहे. कार्यक्रमाचे निवेदन दीप्ती कानविंदे (रत्नागिरी) करणार आहेत. ध्वनी योजना जामसंडे येथील सुधीर घाडी यांची आहे.

वीज पडल्याने कासमध्ये गायीचा मृत्यू
बांदा ः कास येथे विजेचा लोळ गाभण गायीवर पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे शेतकरी योगेश भाईप यांचे ५० हजारांचे नुकसान झाले. गेले आठ दिवस सायंकाळच्या सत्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी (ता. २२) सायंकाळी योगेश अंकुश भाईप हे जनावरांना चारण्यासाठी घेऊन गेले होते. अचानक पाऊस आल्याने ते घरी परतत असताना विजेचा लोळ गायीवर पडला व त्यातच तिचा मृत्यू झाला. यात भाईप यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. तलाठी व्ही. एस. कविटकर यांनी पंचनामा केला.

शिक्षणमंत्री केसरकर आज जिल्ह्यात
सिंधुदुर्गनगरी ः राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर रविवारी (ता. २३) सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून, त्यांचा दौरा असा ः सकाळी साडेआठला शासकीय विश्रामगृह सावंतवाडी येथून तळवडेकडे प्रयाण, नऊला (कै.) प्रकाश परब स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ (तळवडे), दहाला तळवडे येथून सावंतवाडीकडे प्रयाण, साडेदहाला श्रीधर अपार्टमेंट, सावंतवाडी कार्यालयात आगमन व राखीव. रात्री साडेनऊला शिवतेज मित्रमंडळ, सावंतवाडी आयोजित नरकासुर स्पर्धेस भेट, दहाला शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे आगमन व राखीव.