सर्जेकोटच्या फोंडबा कुटुंबीयांना जिल्हा बॅंकेतर्फे धनादेश सुपूर्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्जेकोटच्या फोंडबा कुटुंबीयांना
जिल्हा बॅंकेतर्फे धनादेश सुपूर्द
सर्जेकोटच्या फोंडबा कुटुंबीयांना जिल्हा बॅंकेतर्फे धनादेश सुपूर्द

सर्जेकोटच्या फोंडबा कुटुंबीयांना जिल्हा बॅंकेतर्फे धनादेश सुपूर्द

sakal_logo
By

58310
मालवण ः जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्जेकोट येथील फोंडबा कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश देताना मान्यवर.

सर्जेकोटच्या फोंडबा कुटुंबीयांना
जिल्हा बॅंकेतर्फे धनादेश सुपूर्द
मालवण : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सर्जेकोट येथील फोंडबा कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. सर्जेकोट येथील शंकर सखाराम फोंडबा यांचे १२ जानेवारी २०२१ ला निधन झाले. निधनाचे वृत्त समजल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मालवण शहर शाखेकडून प्रस्ताव सादर केल्यानंतर तो मंजूर करून दोन लाख रुपये रकमेचा धनादेश मालवण शहर शाखेतर्फे देण्यात आला. यावेळी जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस, मेघनाद धुरी, तालुका विकास अधिकारी पूर्णानंद सरमळकर, गवंडी, केळुसकर, शाखा व्यवस्थापक गोसावी, साळसकर आदी उपस्थित होते.