कणकवली :सक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली :सक्षिप्त
कणकवली :सक्षिप्त

कणकवली :सक्षिप्त

sakal_logo
By

कनेडी परिसरात भात कापणी सुरू
कनेडी ः पावसाने विश्रांती घेतल्याने येथील परिसरात शेतकऱ्यांनी भातकापणी सुरू केली आहे. मात्र, शेत-शिवारात पावसाचे पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे झाले नाहीत. मात्र, पावसाने थोडीसी विश्रांती घेतल्याने भातकापणीच्या कामाला सुरवात झाली आहे.

तिरूनवेली एक्सप्रेसला जादा बोगी
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावरील तिरूनवेली-जामनगर एक्सप्रेसला जादा बोगी जोडली जाणार आहे. दिवाळीला प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन २४ व २५ रोजी जादा बोगी जोडल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सध्या रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले आहे. नियमित गाड्या आणि जादा गाड्यांना प्रवाशांनी गर्दी केली आहे.

कणकवलीत महिलांची आरोग्य तपासणी
कणकवली ः जिल्हा आरोग्य विभाग आणि शहर नगरपंचायतीच्या सहकार्यातून महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरांमध्ये साडेचार हजार महिलांची तपासणी करण्यात आली. आता शिबिर २६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. शिबिरामध्ये महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे, सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, कणकसिंधू शहर संघ, आयडियल नर्सिंग स्कूल, तोंडवली नर्सिंग स्कूल आणि शहरातील खाजगी डॉक्टरांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर राबविले जात आहे. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’अभियानांतर्गत हे आरोग्य शिबिर होत आहे.