गोपालक, गोशाळेला यथाशक्ती द्यावी मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोपालक, गोशाळेला यथाशक्ती द्यावी मदत
गोपालक, गोशाळेला यथाशक्ती द्यावी मदत

गोपालक, गोशाळेला यथाशक्ती द्यावी मदत

sakal_logo
By

rat23p3.jpg
58258
रत्नागिरीः वसूबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. वसूबारसनिमित्त गायीची पूजा करताना चरवेली-नागलेवाडी येथील दाम्पत्य शांताराम नागले आणि शमिका नागले.
----------
गोपालक, गोशाळेला यथाशक्ती द्यावी मदत
विक्रम फडके ; वसुबारस ठरेल आधुनिक काळाशी सुसंगत
रत्नागिरी, ता. २४ः पारंपरिक सण, प्रथा आणि त्यानिमित्ताने पाळल्या जाणाऱ्या परंपरा याला आता नवा सध्याच्या परिस्थितीत योग्य असा आयाम देण्याची आवश्यकता आहे. ते सण ज्या काळात सुरू झाले असतील, त्या काळातील परिस्थितीनुरुप प्रथा पडल्या. मात्र आता त्याचे मुळ तत्व ठेऊन त्याला आधुनिक रुप देण्याची गरज समाजसेवक विक्रम फडके यांनी व्यक्त केली.
फडके हे शेती, तसेच बागायतीबाबत जाणकार मानले जातात. नुकत्याच पार पडलेल्या वसुबारसेच्या निमित्ताने त्यांनी वरील विचार व्यक्त केले. त्यापुढे जाऊन आता वसुबारस म्हणजे गायीची पूजा असे फक्त न मानता त्याबाबत काय केले पाहिजे, हे ही त्यांनी नोंदले आहे.
फडके यांनी सांगितले की, वसूबारस म्हणजे आताच्या काळात खरंतर गाई पाळणारे जे गो पालक यांच्यासाठी आपण काही करू शकतो यावर विचार व्हावा. ज्यांनी देशी गाई घरात पाळून त्यावर ते अजूनही उपजीविका करतात. उदा. त्या गोपालकाला शेण, गोमूत्र वास सहन करत थंडी, वारा, ऊन-पाऊस, सण समारंभ, दुःख काहीही असले तरी त्यांना चारापाणी दाखवून शेण काढून स्वच्छ रोजच्या रोज ठेवायचे असते. दूध काढायचे ठरलेल्यावेळी दूध पोचवायचे, त्यांचे आजारपण बघायचे. स्वतः आजारी असलो, घरात कोणी आजारी असले तरी त्यांना मुक्या जनावरांना आधी बघायचे असते. कारण ना त्यांच्याकडे मोबाईल, ना इतर साधन असते, ना त्यांना काही करता येते. असे एकही दिवस सुट्टी न घेता करायचे असते.
वसुबारसेच्या निमित्ताने सध्याच्या काळाशी सुसंगत असे आपण काय करू शकतो हे सांगताना ते म्हणाले, त्यांना हातभार म्हणून गोपालक शेतकरी, गोशाळा बघणारे कोणी असतील तर त्यांना यथाशक्ती मदत पाठवू शकतो किंवा कधीतरी तेथे जाऊन श्रमदान करावे. त्यांच्याकडून खात्रीचे दूध विकत घेऊ शकतो. तसेच गोमय वस्तू जसे की गोमूत्र, अर्क, गोमय पंचगव्य वापरू शकतो. यासाठी जरा थोडासा त्रास करून घेऊन खात्री करून आपल्याच राहत्या ठिकाणी आजूबाजूला नातेवाईक, मित्रमंडळी या कामाशी जोडलेली असतील त्यांच्याकडे जाऊन खात्री करून घ्यावी आणि मगच त्यांना मदत करावी. जेणेकरून त्यांचा भार हलका होईल. ज्यांना CSR निधी वापरायला मिळतो किंवा जे जमा करतात त्यांनी बायोगॅस प्रकल्प करण्याकरता निधी देऊन त्यांना काम करण्यास प्रोत्साहित करता येईल. त्यामुळे गोपालक, शेतकरी, गोशाळा यांच्याकडे बचत चालू होईल.