कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी स्वावलंबन योजनेचा
लाभ घेण्याचे आवाहन
कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

sakal_logo
By

कृषी स्वावलंबन योजनेचा
लाभ घेण्याचे आवाहन
कुडाळ, ता. २३ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन पंचायत समिती प्रशासक तथा गट विकास अधिकारी विजय चव्हाण व सहायक गट विकास अधिकारी बाळकृष्ण परब यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांना सिंचनक्षमता निर्माण करणे, सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नवीन विहीर २ लाख ५० हजार, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार, इनवेल बोअरिंग २० हजार, वीज जोडणी आकार १० हजार, पंप संच २० हजार, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण १ लाख रुपये व सूक्ष्म सिंचन सुविधेंतर्गत तुषार सिंचन-ठिबक सिंचनासाठी २५ हजार ते ५० हजार रुपये हेक्टरी मर्यादेत अनुदान देय आहे. या योजनेंतर्गत ज्या अनुसूचित जाती-नवबौद्ध शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे, त्यांच्या नावे किमान ०.४० हेक्टर व कमाल ६ हेक्टर जमीन धारणा आवश्यक आहे. जमिनीचे सात-बारा, ८ अ उतारे, जातीचा दाखला, आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक खाते पुस्तकाचे पहिले पान, दीड लाखांपेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असल्याबाबत तहसीलदारांकडील दाखला आदी कागदपत्रे आवश्यक असून लाभार्थी निवड ग्रामसभेत करण्यात येते. अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन भरावा लागतो व यासाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडून शेतकऱ्यांनी अर्ज करावयाचे आहेत. यासाठी शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्रे, ग्रामपंचायतीकडील संग्राम केंद्र आदींच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थी म्हणून अर्ज करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक संबंधित संकेतस्थळावर प्रमाणित करून घेणे गरजेचे आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.