वस्तू स्वतः बनवतो तेव्हा त्याचे मोल आगळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वस्तू स्वतः बनवतो तेव्हा त्याचे मोल आगळे
वस्तू स्वतः बनवतो तेव्हा त्याचे मोल आगळे

वस्तू स्वतः बनवतो तेव्हा त्याचे मोल आगळे

sakal_logo
By

rar२३p४.jpg -पाटपन्हाळे ः विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक कंदील व शुभेच्छापत्रे

वस्तू स्वतः बनवतो तेव्हा त्याचे मोल आगळे

मुख्याध्यापक थरकार ; विद्यार्थ्यांनी बनविले कंदिल, शुभेच्छापत्रे
गुहागर,ता.२३ : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे मधील इयत्ता आठवीच्या ब व क तुकडीतील विद्यार्थ्यांनी कार्यानुभव तासाला वेगवेगळे आकाश कंदिल व सुंदर पद्धतीने नवनवीन डिझाईन्समध्ये वेगवेगळी शुभेच्छापत्रे तयार केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कंदिल व शुभेच्छापत्रांचे भरभरून कौतुक करताना मुख्याध्यापक थरकार म्हणाले, बाजारामध्ये या सर्व वस्तू उपलब्ध आहेत, त्याची आपण किंमत मोजतो. पण जेव्हा आपण या वस्तू स्वतःच्या हाताने तयार करतो तेव्हा त्याला असणारे मोल काही औरच असते.
दीपावली हा एक प्रमुख सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान येत असतो. हा एक पवित्र सण आहे जो वाईटावर चांगल्‍याच्‍या विजयाचे प्रतिक आहे. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा दीपोत्सव म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा उजेड आयुष्यामध्ये निर्माण करणे होय. या सणाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. अशावेळी प्रशालेच्या कार्यानुभव तासाला विद्यार्थ्यांकडून आकाश कंदिल, पणत्यांचे रंगकाम , वेगवेगळी शुभेच्छापत्रे तयार करून घेणे यासारखा सुंदर उपक्रम तो कोणता, विद्यार्थी या उपक्रमांमध्ये अत्यंत आनंदाने आणि हौसेने सहभागी होतात.न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे मधील विद्यार्थ्यांनी काही शुभेच्छा पत्र व कंदील मुख्याध्यापकांना भेट दिले. याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक एम. ए. थरकार यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या. कौतुक केले. या आठवणी तुम्हाला आयुष्यभर पुरतील असे सांगत ते म्हणाले की अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या हस्तकलांना वाव मिळतो. या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या सौ. नमिता वैद्य यांचेही मुख्याध्यापकांनी अभिनंदन केले.