राजापूर ः विजा रोखू शकणारे लाइटनिंग अरेस्टर प्रभावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः विजा रोखू शकणारे लाइटनिंग अरेस्टर प्रभावी
राजापूर ः विजा रोखू शकणारे लाइटनिंग अरेस्टर प्रभावी

राजापूर ः विजा रोखू शकणारे लाइटनिंग अरेस्टर प्रभावी

sakal_logo
By

rat२२p९.jpg ः KOP२२L५८०७६ राजापूर ः विजा रोखू शकणारे लाइटनिंग अरेस्टर.


विजा रोखू शकणारे लाइटनिंग अरेस्टर प्रभावी

मनोऱ्यांवर यंत्रणा; विजा कोसळण्याने हानी होणार कमी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २२ ः राजापूर तालुक्यामध्ये गेल्या आठवडाभरामध्ये अनेक ठिकाणी वीज पडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या धोकादायक विजांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी साऱ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. विजा कोसळल्यानंतर लाइटनिंग अरेस्टर या मनोऱ्याच्या माध्यमातून खेचण्याचे काम केले जाते. त्यासाठी मनोऱ्यावर विशिष्ट यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणेच्या साहाय्याने मनोऱ्‍याच्या सुमारे २ कि.मी.च्या परिसरामध्ये पडणाऱ्या विजा खेचण्याची क्षमता आहे. विजा रोखू शकणारे लाइटनिंग अरेस्टर बसवणे हे आव्हान आहे.
मान्सूनच्या सुरवातीला आणि मान्सूनच्या परतीच्यावेळी ढगांच्या गडगडाटासह कोसळणाऱ्या पावसाच्यावेळी विजा कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. आकस्मिक कोसळणाऱ्या या विजांमुळे काहींना प्राण गमवावे लागतात तर, अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. गेल्या काही दिवसांमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट करत जोरदार पाऊस पडत आहे. राजापूरला याचा फटका बसला आहे.

घरात असताना कोणती काळजी घ्यायची
१. ओल्या भिंती आणि धातूचे फर्निचर ः पावसाच्या पाण्यामुळे घरामध्ये ओल असते. लोखंडी कपाट, खुर्ची, टेबल आदी वस्तू या विद्युतवाहक असतात. त्यामुळे ओल असलेल्या भिंती आणि त्यांच्या संपर्कात ठेवलेले लोखंडी वा धातूचे टेबल, खुर्ची, कपाटे आदी वस्तू धोकादायक ठरू शकतात. या वस्तूंच्या विद्युतवाहक गुणधर्मामुळे घराबाहेर वीज पडली तरी क्षणात ती या वस्तूंच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचू शकते.
२. विद्युत उपकरणे ः जमिनीवर पडणाऱ्या विजा जमिनीखाली असणाऱ्या विद्युतवाहक तारांपासून घरातील विद्युत उपकरणापर्यंत पोहचून होणाऱ्या दुर्घटनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विजा चमकत असताना विद्युत उपकरणे बंद ठेवणे अधिक फायदेशीर असते. सर्वच विद्युत उपकरणे सॉकेटमधून विलग करून ठेवावीत. याशिवाय टीव्ही अ‍ॅंटिनाचे कनेक्शन टीव्हीपासून वेगळे करावे. टेलिफोनच्या खांबावर व तारांवरही विजा कोसळतात. गच्चीवर सर्वाधिक उंचीवर लाइटनिंग अरेस्टर लावावे. त्याचे आर्थिग स्वतंत्र ठेवावे.
३. कपडे सुकायला टाकण्यासाठी तारांचा वापर टाळावा ः कपडे वाळत घालण्यासाठी घराच्या परिसरामध्ये अनेकवेळा या तारा बांधलेल्या असतात. विजा चमकू लागल्या की महिला तारांवर वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी धाव घेतात. अशा तारांवर वीज कोसळून दगावण्याची अधिक भिती असते. त्यामुळे कपडे वाळण्यासाठी धातूंच्या तारांऐवजी दोरीचा वापर केल्यास अधिक सोयीचे ठरू शकते.

घराबाहेर असल्यास कोणती काळजी घ्यावी.....
१. वाहते पाणी ः पाणी हे वीजवाहक असल्याने विजा चमकत असताना वाहत्या पाण्यात उभे राहू नये. पाण्यासाठी हातपंप किंवा वीजपंपाचा वापर करू नये. विहिरीतही उतरणे शक्यतो टाळावे.
२. उंच झाड ः पावसामुळे ओली झालेली झाडे ही विजा चमकत असताना अत्यंत धोकादायक असतात. विजा चमकताना झाडांखाली उभे राहू नये. झाडावर वीज कोसळून झाडाखाली थांबणारी व्यक्ती शॉक बसून दगावण्याची शक्यता असते.
३. खुली मैदाने, शेती आणि समुद्रतट ः विजा कमीत कमी रोधकाचा आणि जमिनीचा कडचा लहानात लहान मार्ग प्रवासासाठी निवडतात. त्यामुळे मैदान, शेत, टेकड्या आदी उघड्या ठिकाणी विजा चमकत असताना उभे राहू नये. विजांचा गडगडाट कानी पडण्याआधीच पक्की इमारत, घरं अशा कोरड्या ठिकाणी आसरा घ्यावा. मैदानामध्ये आपल्यावर वीज कोसळण्याचा धोका असतो.
४. कानांची सुरक्षितता ः विजा पडतात तेव्हा मोठा आवाज होतो. त्या आवाजाने कानाचे पडदे फाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशावेळी कानामध्ये बोटे घालून कानाचे पडदे वाचवण्याचा प्रत्न करावा.

लाइटनिंग अरेस्टर उभारणे महत्वाचे.......
विजा कोसळल्यानंतर या मनोर्‍याच्या माध्यमातून त्या खेचण्याचे काम केले जात असून त्यासाठी मनोर्‍यांवर विशिष्ट यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणेच्या साहाय्याने मनोर्‍याच्या सुमारे २ कि.मी.च्या परिसरामध्ये पडणार्‍या विजा खेचण्याची क्षमता आहे. त्यातच, खेचण्यात आलेली वीज जमिनीपर्यंत वाहून नेण्याचीही त्याचवेळी यंत्रणा या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. त्या यंत्रणेमार्फत खेचण्यात आलेल्या विजेची जमिनीपर्यंत सुरक्षितपणे वाहतूक केली जाते.