आधुनिक मशिनसाठी निधी द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधुनिक मशिनसाठी निधी द्या
आधुनिक मशिनसाठी निधी द्या

आधुनिक मशिनसाठी निधी द्या

sakal_logo
By

58315
सावंतवाडी ः वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करताना राजेंद्र मसुरकर, रवी जाधव.


आधुनिक मशिनसाठी निधी द्या

राजू मसुरकर ः सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मागणी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः येथील उपजिल्हा रुग्णालयात अवघड हाडांची शस्त्रक्रिया तसेच आधुनिक मशिनरी नसल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना गोवा-बांबोळी येथे जावे लागत आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक मशिन तसेच उपकरणांसाठी निधी द्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली.
येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातून रुग्ण येत असतात; मात्र हाडांची शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नाईलाजास्तव गोवा-बांबोळी येथे पाठवावे लागते. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निखिल अवधूत काही महिन्यांपूर्वी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाले आहेत. येथील रुग्णालयात किरण सी आर्म एक्स रे यंत्र, ऑर्थोपेडिक इलेक्ट्रॉन इलेक्ट्रो मेन्यूअल सी आर्म एक्स-रे टेबल व एक्स-रेडिएशनल प्रोटेक्शन लीड ऍप्रन अशा प्रकारची मशिनरी व त्याला लागणारी उपकरणे उपलब्ध झाल्यास रुग्णांची अवघड हाडांची शस्त्रक्रिया तसेच पाठीच्या मणक्यांचा आजार असलेल्या रुग्णांवर अचूक निदान करून उपचार होऊ शकतात. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. या मशिनरीमुळे दोन हाडांच्यामध्ये स्टीलचा रॉड टाकून तसेच कमरेखालील खुब्यामध्ये शस्त्रक्रिया करणे सोपे होऊन अनेक वयस्कर तसेच महिला रुग्णांना दिलासा मिळू शकतो. यासाठी ११ लाख ५० हजार रुपये जिल्हा नियोजनमार्फत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून दिल्यास रुग्णांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. जिल्हा नियोजनमार्फत निधी प्राप्त करून द्यावा, अशी अशी मागणी करण्यात आली आहे.