रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

सोबत फोटो आहे.
rat23p13.jpg-KOP22L58292 रत्नागिरी : आंबेड बुद्रुकचे सरपंच सुहास मायंगडे यांचा सत्कार करताना भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन. सोबत प्रकाश खापरे आदी.

आंबेड बुद्रुक सरपंचांचा सत्कार
रत्नागिरी : आंबेड बुद्रुक गावचे गाव विकास समितीचे नवनिर्वाचित सरपंच सुहास मायंगडे यांचा सत्कार भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केला. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपा कार्यकर्ते प्रकाश खापरे उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंचाचे अभिनंदन करताना खूप आनंद होतो. मोठा जनाधार आणि अनुभव पाठीशी असलेले मायांगडे गाव विकासासाठी उत्तम कार्य करतील. सरपंच व नवनिर्वाचीत सदस्य यांची टीम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उत्कृष्ट व लोकाभिमुख कामे करतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केला. भाजपा शासनाच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करा, विकास योजना राबण्यासाठी मदत करा, असे आवाहन याप्रसंगी सरपंच मायंगडे यांनी केले. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व भाजपाचे कोकणचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांनीही दूरध्वनीवरून श्री. मायंगडे याचे अभिनंदन केले.


देव महाविद्यालयात परीक्षा पूर्व समुपदेशन कार्यशाळा
रत्नागिरी : येथील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात परीक्षा विभाग व समुपदेशन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पूर्व समुपदेशन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात महाविद्यालयाच्या परीक्षा विभागातील सदस्य विनय कलमकर यांनी विद्यार्थ्यांना सत्र 1 परीक्षेची तयारी कशी करावी, परीक्षेचे स्वरूप, परीक्षा काळात ताणतणावापासून कसे दूर राहायचे, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, विभागातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक समुपदेशन विभागप्रमुख व परीक्षाविभाग प्रमुख सौ. ऋतुजा भोवड यांनी केले. सूत्रसंचालन राखी साळगावकर यांनी केले. वैभव कीर यांनी आभार मानले.