बाजारपेठ मित्रमंडळातर्फे तळेरेमध्ये रुग्णवाहिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजारपेठ मित्रमंडळातर्फे
तळेरेमध्ये रुग्णवाहिका
बाजारपेठ मित्रमंडळातर्फे तळेरेमध्ये रुग्णवाहिका

बाजारपेठ मित्रमंडळातर्फे तळेरेमध्ये रुग्णवाहिका

sakal_logo
By

58360
तळेरे ः रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी बाजारपेठ मित्रमंडळाचे सदस्य.

बाजारपेठ मित्रमंडळातर्फे
तळेरेमध्ये रुग्णवाहिका
तळेरे, ता. २३ ः येथील बाजारपेठ मित्रमंडळाच्यावतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण डॉ. प्रकाश यशवंत बावधनकर यांच्या हस्ते करण्यात आले. या मित्रमंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात.
तळेरे दशक्रोशीत रुग्णवाहिकेअभावी इतर ठिकाणच्या रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे रुग्णांना पडवे, गोवा, कोल्हापूर अथवा मुंबईला नेताना अडचणी येत होत्या. ही गैरसोय लक्षात घेत बाजारपेठ मित्रमंडळाने रुग्णवाहिकेचे लोकार्पण करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी, सचिन पावसकर, तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार, तळेरे वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, उदय तळेकर, शशांक तळेकर, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जठार, कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर, तळेरे सरपंच साक्षी सुर्वे, उपसरपंच दिनेश मुद्रस, नाना शेट्ये, बाबू राणे, दारुम सरपंच सुनिद्र सावंत आणि बाजारपेठ मित्रमंडळाचे सभासद उपस्थित होते.