संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat23p25.jpg : KOP22L58329 खेड ःयेथे आयोजित इंटरपोल प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी विद्यार्थी

मोरवंडे-बोरज प्रशालेत इंटरपोल प्रश्नमंजुषा
खेड : तालुक्यातील मोरवंडे- बोरज ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल येथे इंटरपोल संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली येथे होत असलेल्या 90 व्या जनरल असेब्लीनिमित्त सदर प्रश्नमंजुषा सर्वच सी.बी.एस.सी. शाळांमध्ये घेण्यात यावी असा शासन निर्णय आला होता . त्यास अनुसरून इयत्ता सहावी ते नववी आणि अकरावीतील विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली होती. यात 23 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इयत्ता सातवीतील मानस आंब्रे याने प्रथम , इयत्ता अकरावीतील साई मालुसरे याने द्वितीय आणि हर्ष आंब्रे याने तृतीय क्रमांक पटकावला . ------------------------------------

फोटो rat23p24.jpg -KOP22L58328 खेड ः तहसील कार्यालयातील कर्मचारी सुनील येलवे यांचा सत्कार करताना तहसीलदार प्राजक्ता घोरपडे

खेड तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांचा सत्कार

खेड : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकून सुनील येलवे यांची दापोली तहसीलमधील पुरवठा विभागात गोदाम व्यवस्थापक - श्रेणी 2 याठिकाणी बदली झाली असून पुरवठा लेखा अव्वल कारकून प्रकाश खांडेकर यांची गुहागर तहसीलमधील पुरवठा विभागामध्ये निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्यांनी खेड कार्यालयात केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचा तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी गुरूवारी ( ता.20) सत्कार केला.निवासी नायब तहसीलदार सिनकर, महसूल नायब तहसीलदार प्रताप राठोड, अप्पर तहसीलदार अमृता साबळे , घुले, कसबे, अलमोड, अक्षय पवार, गावीत, सावंग ,काळबोडे उपस्थित होते.
--
फोटो rat23p26.jpg - KOP22L58330 खेड ः दिव्यांग विद्यार्थ्यानी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्या प्रसंगी उपस्थित मान्यवर


खेड येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
खेड : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत, पंचायत समिती शिक्षण विभाग खेड येथील बहुउद्देशीय संसाधन व संशोधन केंद्र खेड मधील दिव्यांग विद्यार्थी यांनी दीपावलीनिमित्त तयार केलेल्या आकर्षक व स्वस्त दरातील वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतःह बनविलेल्या विविध वस्तूंचा समावेश आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींन करीता. क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, कार्य करणाऱ्या दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत, संस्थेचे पदाधिकारी पांडुरंग नाचरे, मंगेश चांदणे, हर्षद चव्हाण, राजेश धारीया, संदीप आखाडे यांनी मेळाव्यास उपस्थित राहून संस्थेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी श्रीमती.चेतना धारीया(तालुका समन्वयक) रवींद्र देवळेकर (विशेष शिक्षक) विद्या बेंद्रे (विशेष शिक्षक), दत्तात्रय पदुमले (विशेष शिक्षक) आदी उपस्थित होते.

--

फोटो rat23p27.jpg - खेड : महावितरण अधिकाऱ्याना निवेदन सादर करताना काँग्रेसचे पर्यावरण जिल्हा अध्यक्ष किरण तायडे व अन्य


विद्युत पुरवठा खंडीत न करण्याचे महावितरणला साकडे


खेड : दिवाळी हा दीपोत्सव पूर्ण भारतभर साजरा केला जातो. परंपरेनुसार दीपोत्सवास अनन्य साधारण महत्त्व आहे या सणा सुदीच्या काळात महावितरण कडुन सुरू असलेली थकबाकी वसुली मोहीम तूर्तास थांबवून वीज ग्राहकांचा पुरवठा खंडीत करू नये या आशयाचे निवेदन काँग्रेसचे पर्यावरण जिल्हा अध्यक्ष किरण तायडे यांनी येथील महावितरणला सादर केले. यावर्षीचा दिवाळीचा कालावधी 24 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर असा आहे. ऐन दिवाळीमध्ये थकीत वीज बिलाची वसुली केली जात आहे. वसुली न झाल्यास वीज कनेक्शन बंद केले जात आहे. थकीत वसुली होणे अत्यंत आवश्यक असून, त्यास विरोध नसल्याचे सांगून दिवाळी उत्सवाला धार्मिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व असून, अंधारमय जीवनाला प्रकाशाकडे नेण्याचा हा उत्सव आहे. किमान दिवाळीच्या कालावधीमध्ये तालुक्यातील किंबहुना जिल्ह्यातील कनेक्शन तूर्तास बंद करणे थांबवावी अशी मागणी या निवेदना द्वारे करण्यात आली आहे या वेळी काँग्रेस चे सरचिटणीस खलील सुर्वे युवक काँग्रेसचे स्वराज गांधी उपस्थित होते.