नॅक ग्रेड अभ्यासक्रमाच्या फलनिष्पत्तीवर अवलंबून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नॅक ग्रेड अभ्यासक्रमाच्या फलनिष्पत्तीवर अवलंबून
नॅक ग्रेड अभ्यासक्रमाच्या फलनिष्पत्तीवर अवलंबून

नॅक ग्रेड अभ्यासक्रमाच्या फलनिष्पत्तीवर अवलंबून

sakal_logo
By

वराडकर बेलोसे कॉलेजमध्ये नॅकची पूर्वतयारी सुरू
हर्णे,ता.२३ ः नॅक ग्रेड अभ्यासक्रमाच्या फलनिष्पत्तीवर अवलंबून असते. संस्थेच्या साधनसंपत्तीवर नाही, असे मत डॉ. शिल्पा सप्रे यांनी व्यक्त केले. वराडकर बेलोसे कॉलेज दापोलीमध्ये '' नॅक पूर्वतयारी'' या विषयांवर त्या बोलत होत्या.
दापोलीतील वराडकर बेलोसे कॉलेज यंदा चौथ्यांदा ''नॅक'' मूल्यांकन प्रक्रियेस सामोरे जात आहे. त्या अनुषंगाने डॉ. शिल्पा सप्रे भारमल, डीबीजे कॉलेज चिपळूण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संस्थेच्या सभापती श्रीम. जानकी बेलोसे व डॉ. शिल्पा सप्रे यांचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी स्वागत केले. याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे कार्यवाह डॉ. दशरथ उर्फ काका भोसले यांनी आपल्या महाविद्यालयास ''अ'' ग्रेड मिळणे कामी सर्वाना बरोबर घेऊन तिसऱ्या नॅकवेळी कमी पडलेले २८ गुण यावेळी कसे मिळवता येतील त्यासाठी नेकीने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.