भारताच्या विजयानंतर दिवाळी खरेदीचा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारताच्या विजयानंतर दिवाळी खरेदीचा जल्लोष
भारताच्या विजयानंतर दिवाळी खरेदीचा जल्लोष

भारताच्या विजयानंतर दिवाळी खरेदीचा जल्लोष

sakal_logo
By

५८३५५
५८३५६

भारताच्या विजयानंतर खरेदीचा जल्लोष
रत्नागिरी सायंकाळी उजळली; व्यापारीही सुखावले
रत्नागिरी, ता. २३ ः कोकणातील घराघरांत दिवाळीची तयारी सुरू आहे. तरीही रविवारी (ता. २३) रंगलेल्या विश्‍वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यावेळी तरुणांपासून प्रौढांपर्यंतच सर्वच टीव्हीसमोर बसून होते. शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगल्यामुळे खरेदीसाठी सायंकाळनंतर बाजारपेठेत धाव घेतली. त्यामुळे सायंकाळनंतर बाजारपेठा फुलल्या.
कोकणात दिवाळीची पूर्वतयारी गेले चार दिवस सुरू आहे. घराघरांमध्ये फराळ बनविण्याची गडबड उडाली आहे. शहरामध्ये तयार फराळ खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होते. वसूबरस, धनत्रयोदशी पारंपरिक पद्धतीने लोकांनी साजरी केली. सोमवारी (ता. २४) नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नानासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. लक्ष्मीपूजनही त्याच दिवशी असल्यामुळे व्यापारीही त्यासाठी सज्ज झाले आहेत. कोरोनातील दोन वर्षानंतर येत असलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी लोकांनी बाजारपेठेत गेले दोन दिवस गर्दी केली होती. मिठाई, कपडे, फटाके यांसह विविध भेटवस्तूंच्या दुकानात ग्राहक ये-जा करत होते. व्यावसायिकांमध्येही समाधान व्यक्त केले जात होते.
दिवाळीच्या तयारीची कसरत सुरू असतानाच रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून भारत-पाकिस्तान हा सर्वांचा उत्सुकता वाढविणारा सामना रंगला होता. विश्‍वचषक स्पर्धेतील हा सामना असल्याने तो जिंकण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगल्याने रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरही लोकांचा वर्दळ कमी होती. ग्रामीण भागातून खरेदीला आलेल्यां व्यतिरिक्त शहरी भागातील वर्गाचा बाजारपेठेतील राबता कमी होती. हे रामआळी, गोखलेनाका, धनजीनाका परिसरातील व्यापाऱ्यां‍नी सांगितले. एकदाचा भारत जिंकला आणि त्याच आनंदात तरुणांची पावले खरेदीकडे वळली. सायंकाळी रामआळीपासून पुढे बाजारपेठेच्या पूर्ण परिसरात ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडालेली होती. बहुसंख्य लोकांनी भाऊबीजेची खरेदीही रविवारीच करून घेतली. सर्वाधिक गर्दी सराफ, कपडे यांच्या दुकानात दिसत होती.

कोट
दुपारच्या सत्रात बाजारपेठेत लोकांचा राबता कमी होता, परंतु सायंकाळनंतर उत्तरोत्तर गर्दी वाढत गेली. रात्रीपर्यंत खरेदीसाठी ग्राहक येत होते. कोरोनानंतर यंदा समाधानकारक खरेदी झाली.

- गणेश भिंगार्डे, व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष