चिपळूण - बलात्कार प्रकऱणी चिपळूणातील तरूणावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - बलात्कार प्रकऱणी चिपळूणातील तरूणावर गुन्हा
चिपळूण - बलात्कार प्रकऱणी चिपळूणातील तरूणावर गुन्हा

चिपळूण - बलात्कार प्रकऱणी चिपळूणातील तरूणावर गुन्हा

sakal_logo
By

चिपळुणातील तरुणाला
बलात्कार प्रकरणी अटक
चिपळूण, ता. २३ : धामणवणे बौद्धवाडी येथील तरुणाने तरुणीवर बलात्कार केल्याचा
प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात शनिवारी ( ता .२२ ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणाला अटक करण्यात आली आहे. वैभव राजाराम जाधव (वय२८) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ओळखीचा फायदा घेत त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवले होते. जून २०२२ मध्ये त्याने आपल्या बहिणीला तुला भेटायचे आहे असे सांगून घरी बोलावून घेतले. घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर संबंधित तरूणीने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. पालकांनी संबंधित तरूणाच्या विरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानूसार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. संबंधित तरूणीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वैभव जाधव याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. पोलिस निरिक्षक रवींद्र शिंदे अधिक तपास करीत आहेत.