जनजागृती सेवा समितीकडून संगीता कुबल यांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनजागृती सेवा समितीकडून संगीता कुबल यांचा सन्मान
जनजागृती सेवा समितीकडून संगीता कुबल यांचा सन्मान

जनजागृती सेवा समितीकडून संगीता कुबल यांचा सन्मान

sakal_logo
By

58342
संगीता कुबल

प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल यांचा सन्मान
वेंगुर्ले, ता. २३ ः शहराच्या सर्वांगिण विकासासाठी तळमळीने काम करणाऱ्या येथील पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल यांच्या कार्याची दखल घेऊन जनजागृती सेवा समिती, महाराष्ट्रतर्फे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ठाणे येथील जनजागृती सेवा समिती, महाराष्ट्र ही सामाजिक संस्था दरवर्षी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानपत्र देऊन गौरव करते. यावर्षी संगीता कुबल यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. कुबल स्वच्छतेच्या महायज्ञामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना योग्य सेवा हसतमुखाने देतात. कोरोनाग्रस्त रुग्णांशी संपर्क साधणे, त्यांना योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, त्यांना अन्नधान्य-औषधे पुरविणे, रुग्णांच्या कुटुंबीयांकडे आपुलकीने लक्ष देणे अशी सर्वच जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे सहकारी, लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांसमवेत पार पाडली. सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य, महिला सक्षमीकरण, वृक्ष संवर्धन, संरक्षण, पर्यावरण, व्यसनमुक्ती अशा क्षेत्रातील त्यांचे कार्य गौरवास्पद असल्याचे कुबल यांना दिलेल्या सन्मानपत्रामध्ये नमूद आहे.