सावंतवाडीत बुधवारी बौद्ध धम्म परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत बुधवारी बौद्ध धम्म परिषद
सावंतवाडीत बुधवारी बौद्ध धम्म परिषद

सावंतवाडीत बुधवारी बौद्ध धम्म परिषद

sakal_logo
By

सावंतवाडीत बुधवारी बौद्ध धम्म परिषद
सावंतवाडी ः राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्यावतीने बुधवारी (ता. २६) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला अॅड. भीमराव यशवंत आंबेडकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. या धम्म परिषदेत बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जाहीर धम्म परिषदेचे आयोजन केले आहे. यात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम यांनी केले आहे. सावंतवाडी संस्थानातील पडवे गावातील खोती पद्धतीविरुद्ध उठाव करण्यात आला होता. त्यात पडवे गावातील टीपू महार यांच्यावरील खुनाच्या आरोपाबाबत संस्थानचे महाराज बापूसाहेब खेमसावंत यांच्या न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजर होऊन त्यांची बाजू मांडली होती. त्यानंतर टीपू महार यांची देहदंडाची शिक्षा रद्दबातल करण्यात आली होती. त्यावेळी दोन दिवस बाबासाहेब सावंतवाडीत मुक्कामास होते. या ऐतिहासिक क्षणाला ९० वर्षे पूर्ण होत आहेत.