‘आनंदाचा शिधा’ अजूनही कणकवली गोडावूनलाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आनंदाचा शिधा’ अजूनही 
कणकवली गोडावूनलाच
‘आनंदाचा शिधा’ अजूनही कणकवली गोडावूनलाच

‘आनंदाचा शिधा’ अजूनही कणकवली गोडावूनलाच

sakal_logo
By

‘आनंदाचा शिधा’ अजूनही
कणकवली गोडावूनलाच

वाटपासाठी केवळ ४ हजार पिशव्या

कणकवली, ता. २४ ः राज्याने शिधापत्रक धारकांसाठी दिवाळीची भेट म्हणून जाहीर केलेला ‘आनंदाचा शिधा’ अजूनही गोडावूनमध्येच पडून आहे. कणकवलीत अवघ्या २६ हजार ३९३ ग्राहकांसाठी केवळ ४ हजार पिशव्या प्राप्त झाल्या असून आज रवा दाखल झाला आहे. त्यामुळे आज दुपारनंतर प्रत्येक दुकानदाराला ‘आनंदाचा शिधा’ वितरित केला जाणार आहे. वितरणावेळी शिधापत्रकधारक आणि गावातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकत्यांसोबत फोटो काढून तो सरकारला पाठवावा, असा आदेशही देण्यात आला.
राज्याने यंदा दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला खरा; पण या दिवाळीसाठी अवघ्या शंभर रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ किट अद्याप ग्राहकांपर्यंत पोहोचू शकलेले नाही. याचे कारण तालुकास्तरावरील गोडावनात हे धान्य उतरवण्यासाठी दिवाळीची पहाट उजाडली. कणकवली तालुक्यात २६ हजार ३९३ ग्राहकांसाठी ७३ शिधावाटप दुकानांमधून या आनंदाच्या शिधाचे वाटप होणार होते. यासाठी गेल्या चार दिवसांपूर्वी तेल पिशव्या, तूरडाळ, साखर असे जिन्नस प्राप्त झाले होते; मात्र किटमधील रवा अद्यापही गोडावनात प्राप्त झाला नव्हता. आज दुपारी बाराच्या सुमारास कणकवलीच्या गोडावनात रवा वितरणाची गाडी दाखल झाली; मात्र शिधापत्रक धारकांना प्रत्येकी शंभर रुपयांत देण्यात येणाऱ्या किटसाठी ‘आनंदाचा शिधा’ छपाई केलेली पिशवी उपलब्ध करून दिली आहे. कणकवली तालुक्यामध्ये केवळ ४ हजार पिशव्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अजूनही २२ हजार ३९३ पिशव्या उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे या शिधा किट वाटपाचे काय करायचे, असा प्रश्न रेशन दुकानदारांना पडला आहे. तर दिवाळीची पहाट साजरी झाली तरी ग्राहकांना शंभर रुपयांचा आनंदाचा शिधा उपलब्ध न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. आता आनंदाचा शिधा किमान उद्यापासून तरी वाटला जाईल, अशी आशा आहे; पण शिधा वाटण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या अपुऱ्या आल्याने दुकानदारांनी हे वाटप करायचे कसे, असा प्रश्न रेशन दुकानांसमोर पडला आहे.
----------
कणकवलीत आजपासून वितरण
कणकवली पुरवठा विभागाकडे आज दुपारी रवा गाडी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी तालुक्याकडे असलेल्या दोन ट्रकच्या माध्यमातून तालुक्यातील ७३ रेशन दुकानांना आजपासून ''आनंदाच्या शिधा''चे वितरण केले जाणार आहे. रेशन दुकानदारांनी उद्यापासून धान्य दुकानांवर त्याचे वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाच्या निरीक्षक ममता तांबे यांनी दिली आहे.