प्रतिष्ठानच्या कार्याला हजारो हातांचे बळ मिळेल ः कुलकर्णी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिष्ठानच्या कार्याला हजारो हातांचे बळ मिळेल ः कुलकर्णी
प्रतिष्ठानच्या कार्याला हजारो हातांचे बळ मिळेल ः कुलकर्णी

प्रतिष्ठानच्या कार्याला हजारो हातांचे बळ मिळेल ः कुलकर्णी

sakal_logo
By

rat24p4.jpg
58423
रत्नागिरी ः पावस येथील अनुसया आनंदी वृद्धाश्रमात स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने वृद्ध महिलांना फराळ व भेटवस्तू देताना ''सकाळ''चे दत्तप्रसन्न कुलकर्णी, सोबत स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक खानविलकर.
------
प्रतिष्ठानच्या कार्याला हजारोंचे बळ मिळेल
कुलकर्णी; स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे वृद्धाश्रमाला ब्लॅंकेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ः स्वराज्य प्रतिष्ठान लांजा ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम गेली दहा वर्षे राबवत आहे. यामध्ये कोणताही दिखाऊपणा, दांभिकपणा नाही. कर्ताकरविता परमेश्वर असून हे त्याचे देणे त्याला अर्पण करतोय, अशा निःस्वार्थी भावनेतून असे सामाजिक उपक्रम राबवल्यास स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्याला हजारो हातांचे बळ मिळेल, असे मत ''सकाळ'' विभागीय कार्यालय-रत्नागिरीचे दत्तप्रसन्न कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
स्वराज्य प्रतिष्ठान लांजा या संस्थेतर्फे तालुक्यातील पावस येथील अनुसया आनंदी या महिला वृद्धाश्रमातील महिलांना ब्लॅंकेट व दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम झाला. त्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या वेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे लांजाचे अध्यक्ष विनायक खानविलकर, जिल्हा परिषद कृषी अधिकारी विजय पोकळे, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सुहास वाडेकर, सुनील गोसावी, ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री पूजा सावंत, अॅड. सुप्रिया सावंत, सौदी अरबिया संगीत मैफल गाजवणारे संगीत सह्याद्रीचे गनी बलबले येथील संस्थापक यासिन नेवरेकर, राकेश विजय, विनायक नागवेकर, गायिका प्रिया कांबळे, सर्वता चव्हाण, रक्षंदा मोरे, उर्मिला कनगुटकर आदी उपस्थित होते. या वेळी कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक ऋषिनाथ पत्याणे आणि संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आढावा प्रतिष्ठानचे वाडेकर यांनी घेतला.
कार्यक्रमाची सुरवात गणेशस्तवन आणि आली दिवाळी.. या गीताने झाली. वृद्ध महिलांना फराळ व भेटवस्तू देताना स्वरगंधच्या कलाकरांनी या जन्मावर या जगण्यावर, शतदा प्रेम करावे, शोधिशी मानवा, गोमू संगतीने, शुक्रतारा मंद वारा, राजा ललकारी अशी घे अशी उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या गाण्यांनी कार्यक्रम संगीतमय केलाच तर वृद्धाश्रमातील महिलांचा आनंद द्विगुणित केला. या वेळी प्रतिष्ठानच्यावतीने वृद्धाश्रमातील व्यवस्थापक, वृद्ध महिलांची देखभाल करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.