निरबाडेतील आदिवासींना मिळाला आनंदाचा फराळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरबाडेतील आदिवासींना मिळाला आनंदाचा फराळ
निरबाडेतील आदिवासींना मिळाला आनंदाचा फराळ

निरबाडेतील आदिवासींना मिळाला आनंदाचा फराळ

sakal_logo
By

rat24p6.jpg
58425
निरबाडेः येथील आदिवासींना दिवाळीचा फराळ व गृहोपयोगी साहित्य देताना संतोष सुर्वे, सुभाष कदम शिवसेना ग्राहक संघटनेचे पदाधिकारी.
.................
निरबाडेतील आदिवासींना आनंदाचा फराळ
शिवसेना ग्राहक संघटना ; धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानही सामिल
चिपळूण, ता. २५ः दिवाळीच्या तोंडावर शासनाकडून गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी ''आनंदाचा शिधा वाटपा''ची योजना राबवली जात आहे. निरबाडे गावातील आदिवासी समाजाकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची मदतही मिळाली नाही; मात्र शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष व धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी या गावातील आदिवासीं बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांना फराळ आणि इतर घरगुती साहित्य वाटप केले. त्यामुळे आदिवासींच्या चेहऱ्यावर हास्य खुललेले दिसून आले. महिलांनी भरलेल्या डोळ्यांनी समाधानही व्यक्त केले.
निरबाडे येथे आदिवासी कातकरी समाजाची अनेक वर्षापासूनची वस्ती आहे. कोणतंही ओळखपत्र नसल्याने या आदिवासींना शासकीय लाभ मिळत नाहीत.
येथील आदिवासींना शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून कोणीही प्रयत्न करत नाही. दिवाळीच्या तोंडावर शासनाकडून गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी आनंदाचा शिधा वाटपाची योजना राबवली जात आहे; परंतु या आदिवासी समाजाकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची मदतही मिळाली नाही. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष व धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिवाळी तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाच्या औचित्याने दिवाळी फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाते. यंदा निरबाडे गावातील राजवाडा येथील आदिवासी ग्रामस्थांना फराळ, ब्लॅंकेट व पणती वाटप करण्यात आले. पत्रकार सुभाष कदम यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख संतोष सुर्वे, सूरज कदम, अविनाश सावंत, उमेश गुरव, विजय जाधव उपस्थित होते.
............
कोट
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष व आनंद दिघेसाहेब प्रतिष्ठानतर्फे सामाजिक बांधिलकीचे भान राखत समाजाशी ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न केला जातो. आदिवासी बांधवांच्या जीवनात या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश निर्माण केला आहे.
- राजू महाडिक, शिक्षक निरबाडे