कर्मचारी पतसंस्था अध्यक्षपदी मालंडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचारी पतसंस्था अध्यक्षपदी मालंडकर
कर्मचारी पतसंस्था अध्यक्षपदी मालंडकर

कर्मचारी पतसंस्था अध्यक्षपदी मालंडकर

sakal_logo
By

58437
सिंधुदुर्गनगरी : नवनियुक्त अध्यक्ष विठ्ठल मालंडकर, उपाध्यक्ष एकनाथ सावंत यांचे अभिनंदन करताना निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला यादव, संस्था सचिव विजय आंदुर्लेकर आदी.

कर्मचारी पतसंस्था अध्यक्षपदी मालंडकर

बिनविरोध निवड; एकनाथ सावंत उपाध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विठ्ठल विश्वनाथ ऊर्फ आबा मालंडकर, तर उपाध्यक्षपदी एकनाथ सावंत यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षक उर्मिला यादव यांनी काम पाहिले.
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी संस्थेसाठी २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक १६ ला होत १७ ला निकाल जाहीर झाला. या नवनिर्वाचित संचालकांमधून विठ्ठल मालंडकर व एकनाथ सावंत यांची अध्यक्ष, उपाध्यक्ष या पदांसाठी निवड झाली. अध्यक्षपदी निवड झालेले मालंडकर यांनी मागील संचालक मंडळात संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी उपाध्यक्षपदाचा कार्यभारही सांभाळला होता. या निवडीसाठी नवीन संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी माजी अध्यक्ष सी. डी. परब, उदय खानोलकर यांनी उपस्थित राहून यांनी मागील संचालक मंडळ आणि कर्मचारी यांचे सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले. सूरज देसाई यांनी पूर्वीप्रमाणे सर्वांनी यापुढे सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी नवनिर्वाचित सदस्य अमित तेंडोलकर, सुनील बाणे, श्रीकृष्ण मुळीक, विनोद राणे, नीलेश मयेकर, संतान फर्नांडिस, कुणाल मांजरेकर, विशाल चौगुले, संतोष परब, न्हानू दळवी, शुभम मुळीक, आनंद चव्हाण, शमिका घाडीगावकर, गीतांजली वालावलकर, संस्था सचिव विजय आंदुर्लेकर, संतोष रावले, सचिन सावंत, तुकाराम शेडगे आदी उपस्थित होते.