वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेच्या अनुदानात भरघोस वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेच्या अनुदानात भरघोस वाढ
वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेच्या अनुदानात भरघोस वाढ

वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेच्या अनुदानात भरघोस वाढ

sakal_logo
By

‘तांडावस्ती’च्या अनुदानात भरघोस वाढ
महाराणी अहिल्यादेवी समाजप्रबोधन मंच; सुधारित जीआर
खेड, ता. २४ः तांडावस्ती सुधार योजनेच्या अनुदानात भरघोस वाढ झाली आहे. महाराणी अहिल्यादेवी समाजप्रबोधन मंचने यासाठी केलेल्या पाठपुरवठ्याला यश आले आहे. याआधी लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची अल्प तरतूद ही अट जाचक ठरत होती.
कोकणात सह्याद्री पर्वताच्या दऱ्याखोऱ्यांत वसलेल्या धनगरवाड्यांच्या विकासाला वरदान असणारी, वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेत यापूर्वीच्या जीआरनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची अल्प तरतूद असल्यामुळे या योजनेचा परिपूर्ण फायदा धनगरवाड्यांना होत नव्हता.
धनगरवाड्यांना लोकसंख्येची अट शिथिल करून अनुदानात वाढ करावी यासाठी मागील तीन वर्षांपासून, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी या संघटनेतर्फे शासनदरबारी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले आहे. संघटनेच्या पाठपुराव्याची दखल मागील ठाकरे सरकारने घेतली होती. या योजनेचा सुधारित जीआर ३० मे २०२२ या तारखेचा आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय मागील सरकारलाच जाते. ३० मे २०२२ च्या सुधारित जीआरनुसार या योजनेच्या फायद्याच्या बाजू खालीलप्रमाणे आहेत. यापूर्वी ५१ ते १०० लोकसंख्या असणाऱ्या वाड्यांना विकासकामासाठी फक्त ४ लाखाची तरतूद होती तेथे आता १५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी १०१ ते १५० लोकसंख्या असणाऱ्या वाड्यांना विकासकामासाठी फक्त ६ लाखाची तरतूद करण्यात आली होती तेथे आता रु. २० लाख मिळणार आहेत. यापूर्वी १५१च्या पुढे लोकसंख्या असणाऱ्या वाड्यांना विकासकामांसाठी फक्त १० लाखाची तरतूद होती तेथे आता लोकसंख्या १५१ ते ३०० लोकसंख्या असणाऱ्या वाड्यांना २५ लाख मिळणार आहेत.
सरकारने ३० मे २०२२ च्या वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेच्या सुधारित जीआरची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित प्रशासकीय विभागांना दिल्यामुळे कोकणातील धनगर समाज व अन्य सहयोगी भटक्या विमुक्त समाजांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
-----------------
चौकट
संत रामराव महाराज सभागृहाला निधी
सुधारित जीआरमध्ये बहुसंख्येने भटक्या विमुक्त समाजांची लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये संत रामराव महाराज सभागृह/समाजमंदिर बांधण्यासाठी २५ लाखाची तरतूद केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात धनगरवाड्या व अन्य भटक्या विमुक्त समाजवाड्यांवर मोठ्या प्रमाणात संत रामराव महाराज सभागृह/समाजमंदिर मोठ्या प्रमाणात होऊ शकतील.