कोंबडी अंड्यांसाठी उभारला स्थानिक पर्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंबडी अंड्यांसाठी उभारला स्थानिक पर्याय
कोंबडी अंड्यांसाठी उभारला स्थानिक पर्याय

कोंबडी अंड्यांसाठी उभारला स्थानिक पर्याय

sakal_logo
By

rat२४p१४.jpg
५८४४४
मिरवणे (ता. चिपळूण)ः येथील कुक्कुटपालन प्रकल्प.

rat२४p१५.jpg
५८४४५
मिरवणेः विक्रीसाठीची अंडी.

rat२४p१६.jpg
५८४४६
मेघना आणि मंगेश गुढेकर

कोंबडी अंड्यांसाठी उभारला स्थानिक पर्याय
मिरवणेत गुढेकर दाम्पत्याचा प्रकल्प; एक हजार कोंबडीपालनातून रोज साडेनऊशे अंड्यांची विक्री
रत्नागिरी, ता. २४ ः पश्‍चिम महाराष्ट्रासह सातारा येथून कोंबड्यांची अंडी रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. त्याला स्थानिक पातळीवरच पर्याय निर्माण करण्यासाठी मिरवणेतील (ता. चिपळूण) मंगेश गुढेकर आणि त्यांच्या पत्नी मेघना यांनी अंडीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी एक हजार कोंबड्या पाळल्या असून, दिवसाला सुमारे साडेनऊशे अंडी ते आजूबाजूच्या गावात विकतात. ताजी आणि दर्जेदार अंडी असल्यामुळे मागणी वाढत असून गुढेकर कुटुंबाला उत्पन्न देणारा व्यवसायही मिळाला आहे.
घरोघरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणारी छोटी-छोटी कुटुंबे आहेत. त्यातील काही लोकं गावठी अंडी विक्री करतात; परंतु व्यावसायिक तत्त्वावर अंडी विक्री करणारे कमी आहेत. कोंबडीने अंडी घातल्यानंतर दुसर्‍या दिवशी ती परजिल्ह्यातून जिल्ह्यात आणली जातात. अंड सर्वसाधारणपणे आठ दिवस टिकते; पण ॠतूचक्रानुसार तो कालावधी कमी-जास्त होतो. परजिल्ह्यातून अंडी आणण्यापेक्षा गावातच असे नियोजन केले तर ताजी अंडी लोकांना देता येतील आणि दर्जाही चांगला राहील, या उद्देशाने व्यवसाय सुरू केला. त्यासाठी शेतकरी सहलींच्या निमित्ताने त्यांनी पुणे, सातार्‍यात दौरे केले. जानेवारी २०२२ मध्ये प्रकल्पाला सुरवात केली. या प्रकल्पासाठी सात लाख रुपये खर्च आला. त्यातील एक लाख रुपये अष्टविनायक बचतगटाच्या माध्यमातून मिळाले. उर्वरित सहा लाखाची जुळणी विविध माध्यमातून केली.
कोकणातील वातावरण दमट आहे. या वातावरणाला पूरक अशी कोंबडी तीही अंडी घालण्यासाठी कोणती याचा त्यानी अभ्यास केला. याबाबत माहिती घेतली. अंडी घालण्यासाठी पाळली जाणारी बीव्ही ३०० या जातीची त्यांनी निवड केली. विन्कीस या कंपनीने ही जात विकसित केली आहे. ही कोंबडी दीड वर्षे अंडी देते. १७ आठवड्यांचे पक्षी अंडी घालण्यास सुरवात करतात. पहिल्या वर्षी ९६० पक्षी गुढेकर यांनी खरेदी केले. मिरवणे, रामपूर, घोणसरे, मार्गताम्हाणे या गावातील दुकानदारांकडे गुढेकरांकडील अंडी विक्रीसाठी ठेवली आहेत. जिल्हा उद्योग केंद्र, उमेद अभियान यांच्या सहकार्याने मोठा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात प्राथमिक बैठकही झाली आहे. भविष्यात शासनाकडून सबसिडी मिळाली तर हा प्रकल्प अस्तित्वात येईल.

चौकट
असा ठरवला जातो दर
अंड्यांचे दर राज्यात एकाचवेळी ऑनलाइन ठरवले जातात. एप्रिल, मे आणि श्रावण महिन्यात दर कमी तर उर्वरित कालावधीत दर चढे असतात. उन्हाळ्यात हा दर ३ रुपये ८५ पैसे एका अंड्याला असा असतो. त्या वेळी तोटा सहन करावा लागतो तर पुढे तो वधारतो. सर्वाधिक दर ५ रुपये ९० पैशांपर्यंत मिळाला आहे. दरातील चढ-उतारानुसार अंड्यांमागील फायद्याचे गणित ठरते.

कोट
अंड्यांच्या व्यवसायात धोक अधिक आहेत. व्यवस्थापन उत्तम जमले तर हा व्यवसाय नफा मिळवून देतात. सध्या जमही चांगला बसला आहे. भविष्यात वृद्धी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
- मंगेश गुढेकर, मिरवणे