‘शिवराई’ हळवल, ‘पटकीदेवी’ संघ विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिवराई’ हळवल, ‘पटकीदेवी’ संघ विजेता
‘शिवराई’ हळवल, ‘पटकीदेवी’ संघ विजेता

‘शिवराई’ हळवल, ‘पटकीदेवी’ संघ विजेता

sakal_logo
By

58472
कणकवली : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नरकासुर स्पर्धेत सहभागी मंडळे.

‘शिवराई’ हळवल, ‘पटकीदेवी’ संघ विजेता

शिंदे गट, ‘समृद्धी’तर्फे कणकवलीत नरकासुर स्पर्धा

कणकवली, ता.२५ : बाळासाहेबांची शिवसेना आणि समृद्धी फाउंडेशनतर्फे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नरकासुर स्पर्धा झाली. यात शिवराई मित्रमंडळ हळवल आणि पटकीदेवी मित्रमंडळ कणकवली यांनी बनविलेल्या नरकासुर प्रतिकृतीला विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला.
आचरा येथील हॉटेल उद्योजक तथा शिवसैनिक महेश राणे यांच्या हस्ते प्रथम विजेत्यांना रोख ११ हजार १०१ रुपयांचे पारितोषिक विभागून देण्यात आले. तर द्वितीय क्रमांकाचे रोख रु ७ हजार ५०१ रुपयांचे पारितोषिक महापुरुष मित्रमंडळ बाजारपेठ आणि भालचंद्रनगर मित्रमंडळ कणकवलीला विभागून दिले. तृतीय क्रमांक विजेता आंबेआळी मित्रमंडळ कणकवलीला रोख पाच हजार ५०१ रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. उत्तेजनार्थसाठी सुदर्शन मित्रमंडळ कणकवलीला रोख दोन हजाराचे पारितोषिक मिळाले.
समृद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रवीण पारकर, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे शिवसैनिक भास्कर राणे, नीलेश तेली यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. ज्येष्ठ नाट्यकर्मी सुहास वरूणकर यांनी परीक्षण केले. शिवाजी चौकात झालेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आकर्षक नरकासुर पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, संदेश पटेल, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, सुनील पारकर, शेखर राणे, मारुती सावंत, दामू सावंत, बाळू पारकर, अश्विन हळदणकर यांनी स्पर्धेसाठी मेहनत घेतली.